आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाचा खून:एरंडोलला शेतीच्या वादातून तरुणाचा खून, जमावाने मारले गुप्तांगावर दगड; खुनाचा गुन्हा दाखल; पाच संशयितांना अटक

जळगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतीच्या वादातून भाऊबंदकीत सुरू असलेल्या वादात एका तरुणास जमावाने बेदम मारहाण केली. गुप्तांगावर दगड मारल्याने गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ७.३० वाजता ही घटना घडली. उमेश आबा महाजन (वय २६, रा. मारुती मढी, एरंडोल) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान पाेलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पाच संशयितांना अटक केली.

तुकाराम भगवान महाजन, उषाबाई महाजन, मनोज महाजन, सुरेश भगवान महाजन व अनिल महाजन अशी संशयितांची नावे आहेत. आबा महाजन यांच्या आई सोनाबाईंच्या नावावर एरंडोल शिवारात दोन बिघे जमीन आहे. ही जमीन आबा यांच्यासह त्यांचे भाऊ सुरेश, तुकाराम व मगन असे चौघे भाऊ प्रत्येकी एक वर्ष कसतात. जमीन कसणारा भाऊ येणाऱ्या उत्पन्नातून आई सोनाबाई यांना १५ हजार रुपये देतो.

दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून ही जमीन सुरेश, तुकाराम व मगन यांचे कुटंुबीय कसते आहे. आबा महाजन यांचा मुलगा उमेश हा याचा जाब विचारण्यासाठी गुरुवारी सकाळी शेतात गेला. या वेळी संतापलेल्या सुरेश, तुकाराम, मगन, मनोज, उषा महाजन व इतरांनी उमेशवर हल्ला चढवला. दगड, काठ्या, लाथा-बुक्क्यांनी त्याला मारहाण केली. उमेशच्या गुप्तांगावर दगड मारल्याने तो बेशुद्ध पडला होता. कुटुंबीयांनी त्याला एरंडोलच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.

अंतर्गत रक्तस्राव, डोक्यास जबर दुखापत झालेली असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला शासकीय रुग्णालयात पाठवले. उपचारादरम्यान दुपारी चार वाजता उमेशचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत कुटुंबीय रुग्णालयात थांबून होते. उमेशला मारहाण करणाऱ्या सर्वांवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला. त्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...