आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात लहान मुलांत हाता-पायावर आणि ताेंडात पुरळ येणाऱ्या बालरुग्णांचे प्रमाण वाढले आहे. वैद्यकीय भाषेत त्याला ‘हँड, फूट, माउथ डिसीज’ असे म्हणतात. शहरात दररोज प्रत्येक बालराेगतज्ज्ञाकडे ओपीडीत चार ते पाच रुग्ण या विषाणू संसर्गाची आढळून येत आहे.
आठ वर्षाआतील मुलांत या आजाराची लक्षणे आढळून येताहेत. दरम्यान, आजार संसर्गजन्य आहे. तुमचे मूल या विषाणूची लागण झालेल्या दुसऱ्या मुलाच्या स्पर्शाने किंवा संपर्कात आल्याने या आजाराला बळी पडू शकते. या आजाराची लक्षणे सात ते दहा दिवसांपर्यंत दिसू शकतात. विषाणूची लागण झाल्यानंतर तीन ते पाच दिवसांनी मुलांना ताप आणि इतर फ्लू सारखी लक्षणे दिसतात. ताप येणे, भूक न लागणे किंवा खाणंपिणं कमी होणं, घसा खवखवणे आणि अशक्तपणा वाटणे या लक्षणांचा समावेश होतो. मुलांच्या हाताच्या आणि पायाच्या तळव्याच्या त्वचेवर पुरळसारखे लाल चट्टे दिसू शकतात.
आजार आठवड्यात बरा हाेताे
हात, पाय आणि तोंडाच्या आजारास कारणीभूत विषाणूपासून संरक्षणासाठी लस नाही. लक्षणांच्या आधारावर उपचार केले जातात. हात, पाय आणि तोंडाचा हा आजार सामान्यतः सौम्य असतो. एका आठवड्याच्या आत बरा होतो. पण दुर्लक्ष करू नये. लक्षणे दिसताच उपचार घ्या.
डॉ. हेमंत पाटील, बालरोगतज्ज्ञ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.