आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल‎‎:दहा लाख घेऊन विवाहितेचे पलायन‎

जळगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎लग्नापूर्वी प्रेमसंबंध असल्याचे पतीपासून‎ लपवून ठेवले. चुलत भावाच्या लग्नाला‎ जाण्याचा बहाणा करून पतीच्या घरातून १०‎ लाख रुपये रोख व दागिने घेऊन तिने‎ प्रियकरासोेबत पलायन केल्याची‎ खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.‎

याप्रकरणी विवाहितेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा‎ दाखल करण्यात आला आहे.‎ शहरात राहणाऱ्या एका तरुणाचे सन २०१२‎ मध्ये इंदूर (मध्य प्रदेश) येथील तरुणीशी लग्न‎ झाले आहे. तत्पूर्वी या तरुणीचे लग्नाआधीच‎ जळगावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते.‎ लग्नानंतर तिचे माहेरच्यांना पैशांची गरज‎ असल्याचे सांगून अनेकवेळा पतीकडून पैसे‎ घेतले. हे पैसे ती प्रियकराला देत असल्याची‎ माहिती समोर आली होती.

बातम्या आणखी आहेत...