आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपर पोलिस अधीक्षक‎ गवळी यांचे आवाहन‎:प्रत्येक कार्यालयात महिलांसाठी‎ तक्रार निवारण समिती स्थापन करा‎

जळगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव‎ भारतीय संस्कृतीने महिलांना‎ आदराचे स्थान दिलेले आहे. त्यांचा‎ नेहमी सन्मान केला पाहिजे. असाच‎ सन्मान प्रत्येक आस्थापनेने दिला‎ पाहिजे. कामाच्या ठिकाणी‎ महिलांचा होणाऱ्या लैंगिक‎ छळापासून संरक्षणासाठी प्रत्येक‎ कार्यालयात तक्रार निवारण समिती‎ स्थापन करण्याचे आवाहन अपर‎ पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी‎ यांनी केले.‎ महिला व बाल विकास‎ अधिकारी कार्यालयातर्फे मंगळवारी‎ नियोजन सभागृहात कामाच्या‎ ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ‎ कायद्यानुसार सर्व कार्यालय प्रमुख‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ व तक्रार निवारण समिती अध्यक्ष,‎ सदस्यांसाठी कार्यशाळा घेण्यात‎ आली.

या वेळी विभागीय उपायुक्त‎ चंद्रशेखर पगारे, अपर‎ जिल्हाधिकारी प्रवीण महाजन,‎ महिला व बाल विकास अधिकारी‎ वनिता सोनगत उपस्थित होत्या. या‎ वेळी राष्ट्रीय बालिका दिनाचे‎ औचित्य साधून बाल विवाह‎ प्रतिबंधाबाबतच्या पोस्टरचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अनावरण करण्यात आले. ‘मुलगी‎ वाचवा, मुलगी शिकवा’ या‎ अभियानात सहभागी होऊन‎ अभियानाच्या यशस्वितेसाठी‎ सर्वांनी प्रतिज्ञा घेतली. अॅड. विजेता‎ सिंग यांनी महिला सुरक्षित‎ असाव्यात, तिला कामाच्या ठिकाणी‎ सन्मान मिळण्यासाठी विभाग‎ प्रमुखांनी दक्ष असावे, असेल‎ देखील आवाहन केले.‎

बातम्या आणखी आहेत...