आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:गोदावरी अभियांत्रिकीमध्ये‎ स्टुडंट कौन्सिलची स्थापना‎

जळगाव‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोदावरी अभियांत्रिकी व‎ तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये‎ विविध शाखांचे स्टुडंट कौन्सिलची‎ स्थापना करण्यात आली. या वेळी‎ वैभव कुशारे, प्राचार्य डॉ.‎ विजयकुमार पाटील, प्रा. हेमंत‎ इंगळे, प्रा. दीपक झांबरे आदी‎ उपस्थित होते.‎ स्टुडन्ट कौन्सिल स्थापनेच्या‎ समारंभात सर्व शाखांच्या‎ कौन्सिलच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या‎ पदानुसार बॅचेसचे वाटप करून‎ त्यांना गौरवण्यात आले.

त्यानंतर‎ आगामी काळात कौन्सिलच्या‎ माध्यमातून करण्यात येणाऱ्या‎ कार्यक्रमाचा आढावा घेण्यात‎ आला. यात तेजल झोपे, रोशनी‎ पाटील, भाग्यश्री मंडावडे, हर्षल‎ परदेशी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित‎ केले. विद्यार्थी दशेत असताना‎ आपण सर्वांगीण विकास करणे‎ गरजेचे आहे. जेणेकरून आपण‎ एक उत्तम लीडर होऊ शकतो, या‎ गोष्टींशी पटवून देण्यात आल्या.‎ त्याचप्रमाणे महाविद्यालयामध्ये‎ अशा उपक्रमांना प्राधान्य दिलं जाते‎ ही खूप महत्त्वाची बाब आहे, असे‎ त्यांनी नमूद केले. केतकी टिकले व‎ पूर्वेश बऱ्हाटे यांनी सूत्रसंचालन‎ केले. दिव्या काळे हिने आभार‎ मानले. या वेळी प्राध्यापक आदी‎ उपस्थित हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...