आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Estimated Time Table Of MPSC Exam 2023 Announced By The Commission Major Recruitment In Last 10 Years; The Number Of Students Increased In Academics

MPSC परीक्षा 2023 चे अंदाजित वेळापत्रक जाहीर:आयोगातर्फे गत 10 वर्षांतील मोठी पदभरती; अभ्यासिकांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली

जळगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2023 मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, महाराष्ट्र 3 अराजपत्रित गट- ब व गट- क सेवा संयुक्त परीक्षा आणि महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा या तीनही परीक्षांच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

येथे करा क्लिक

परिक्षेसंदर्भातील अधिक माहिती​ ​​​​​​आयोगाच्या https://mpsc.gov.in तसेच https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची अभ्यासिकांमध्ये गर्दी वाढली आहे. प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत यादृष्टीने आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित केले आहे.

एमपीएससी परीक्षांचे वेळापत्रक

  • दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2023 : पुर्वपरीक्षा मार्च 2023, निकाल मे 2023 तसेच मुख्य परीक्षा 8 जूलै, सप्टेबर 2023
  • महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा 2023 : राज्यसेवेसह विविध 9 विभागांतील अधिकारी पदांच्या निवडीसाठी परीक्षा होईल.
  • पूर्व परीक्षा 4 जून 2023 रोजी होईल. तर जुलै 2023 मध्ये निकाल जाहीर हाेईल. त्यानंतर नऊ सेवांसाठीच्या मुख्य परीक्षा हाेतील.
  • राज्यसेवा : 33 संवर्गासाठी परीक्षा 30 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर 2023 पर्यंत. निकाल जानेवारी 24
  • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 : 14 ऑक्टोबर 2023 रोजी. निकाल डिसेंबर 2023 मध्ये.
  • सहायक कार्यकारी अभियंता गट - अ (स्थापत्य) - 14 ऑक्टोबर, निकाल डिसेंबर 2023
  • महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023-15 ऑक्टोबर, निकाल डिसेंबर 2023 रोजी जाहीर.
  • कृषी सेवा मुख्य परीक्षा - 15 ऑक्टोबर, निकाल -डिसेंबर 2023
  • सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र मुख्य परीक्षा 21 ऑक्टोबर, निकाल - डिसेंबर 2023
  • अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 28 ऑक्टोबर, निकाल - डिसेंबर 2023

2022 रोजीच्या जाहिरातीत 114 जागांची वाढ झाल्याने राज्यसेवेच्या 509 पदांवरून भरतीची पदसंख्या आता 623 इतकी झाली आहे. गत 10 वर्षांतील ही सर्वाधिक पदसंख्या आहे. त्यामुळे पुढील वर्षी शासकीय नोकरीत जाण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...