आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयाच्या शिक्षकांना पत्र पाठवून परीक्षेच्या मूल्यमापनाचे काम गांभीर्याने करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात प्राध्यापक संघटनेने सहकार्य करण्याचा शब्द दिला आहे; परंतु प्राध्यापकांचा विचार विद्यापीठ का करीत नाही? अशी खंत व्यक्त केली. तर सिनेट सदस्य नितीन ठाकूर यांनी रोष व्यक्त केला. कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी शिक्षकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, विद्यापीठ परीक्षांना नुकतीच सुरुवात झाली. परीक्षा विद्यार्थ्याच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची असते. अध्यापन करण्याची जबाबदारी अध्यापकांनी पार पाडल्यानंतर विषय ज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात केले की नाही? याचे मूल्यमापन करण्यासाठी परीक्षा हा अनिवार्य टप्पा आहे. त्यामुळे परीक्षेनंतर सुरू होणाऱ्या उत्तरपत्रिका मूल्यमापन पत्रिकेत शिक्षकांची भूमिका कळीची आहे.
प्राध्यापकांच्या अडचणींचाही विचार करावा
कुलगुरूंच्या आवाहनाला आम्ही सकारात्मकतेने बघतो. प्राध्यापकही आपले काम चोख बजावतात. पण विद्यापीठाकडून दरवर्षी सुट्या, परीक्षा नियोजनबाबत ऐनवेळेस बदल करण्याची परंपरा याही वर्षी कायम आहे. परगावी जाणाऱ्या प्राध्यापकांच्या अडचणींचाही विद्यापीठाने विचार करावा. विद्यापीठाला अकॅडमिक कॅलेंडर वारंवार बदलावे लागते. इतर विद्यापीठांना जे जमते ते आपल्याला का जमत नाही? - प्रा. नितीन बारी, अध्यक्ष, एन.मुक्ता संघटना, जळगाव
विद्यापीठ प्रशासनाने स्वत: जबाबदारी घ्यावी
निकालांमध्ये सातत्याने घोळ होत आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या यंत्रणेत अनेक त्रुटी आहेत. प्रशासन प्राध्यापकांवर जबाबदारी झटकून मोकळे होत आहे. कुलगुरूंनी याबाबत प्रमुख म्हणून स्वत: जबाबदारी घेऊन उपाय शोधले पाहिजे . - नितीन ठाकूर, सिनेट सदस्य, कवयित्री बहिणाबाई चौधरी उमवि.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.