आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शहराला १० दिवस पुरेल इतके ८५० दशलक्ष लिटर्स पाण्याचे उष्णतेने दररोज बाष्पीभवन ; रोज वापर ८५ एमएलडी, बाष्पीभवन १५ ते ३० टक्के

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मे महिन्यात दोन ते तीन अंशांनी सरासरी तापमान वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाघूर, हतनूर आणि गिरणा या तीन प्रकल्पातून दररोज तब्बल ८५० एमएलडी (दशलक्ष लिटर्स) पाण्याची वाफ होत आहे. हवेत उडून जाणारे पाणी रोज ८५ एमएलडीची गरज असलेल्या जळगाव शहराला १० दिवस पुरेल एवढे आहे. मे महिन्यात गेल्या १२ दिवसांत तापमान ४५ अंशापुढे गेल्याने बाष्पीभवनाची गतीही १५ ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. तापमान सर्वाधिक ४७ अंशांवर पोहचलेल्या भुसावळ पासूनजवळ असलेल्या हतनूर प्रकल्पातून मागील वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी अधिक बाष्पीभवन होत आहे. १ ते १२ मे दरम्यान या प्रकल्पातून ४.८३ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाले.

बातम्या आणखी आहेत...