आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनस्वी सोनवणे अपघात प्रकरणाची चाैकशी सुरू:दीड महिना लाेटला तरी सीसीटीव्ही फुटेज मिळेना

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिव काॅलनी स्टॉपवर १५ नोव्हेंबर रोजी भरधाव डंपरने कट मारल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार मनस्वी सोनवणे या तरुणीचा मृत्यू झाला. या अपघातानंतर तासाभरात या डंपरचे पीयूसी (पोल्युशन अंडर कन्ट्रोल सर्टीफीकेट) काढण्यात आले. प्राथमिक चौकशीत ही बाब सिद्ध झाली आहे. आरटीओच्या प्राथमिक चौकशीत डंपरचालक, मालक दोषी असल्याचे आढळून आले आहे. अधिक चौकशीसाठी आरटीओने पोलिसांकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मागितले आहेत; परंतु दीड महिना उलटूनही पोलिसांनी फुटेज दिले नाहीत. त्यानंतर आरटीओंनी देखील पुढे काही प्रयत्न केले नाहीत.

मनस्वीचा अपघात दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास झाला. त्यानंतर काही वेळातच डंपरचे पीयूसी काढले गेले होते. या अपघातात तरुण मुलीचा जीव गेला आहे. तरी देखील आरटीओ व पोलिस यंत्रणेने अद्याप संपूर्ण चौकशी केली नाही.

बातम्या आणखी आहेत...