आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय कार‘भार:सीएस कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर छत बसवण्यासाठी पीडब्ल्यूडीला तीन वेळा देऊनही काम मार्गी लागेना

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात वरच्या मजल्यावर असलेल्या महिला प्रसूती पश्चात कक्षातील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून उरलेले खरकटे अन्न पदार्थ व कचरा फेकला जाताे. स्वत: सीएस व शासकीय लेखा परीक्षकांच्या अंगावरही हा कचरा पडण्याचे प्रकार दाेनदा झाले आहे. त्यामुळे प्रवेशद्वाराजवळ छत बसवण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला नाेव्हेंबर २०२१ पासून सीएस कार्यालयाने पाठपुरावा करण्यासाठी तीन वेळा स्मरणपत्र देण्यात आले आहे; पण पीडब्ल्यूडी विभागाला जाग आलेली नाही.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला जुने सिव्हिल साेपवल्यानंतर सिव्हिल सर्जन यांची केबिन व कार्यालय मागील बाजूला गेले आहे. त्यावरील मजल्यावर महिला प्रसूती पश्चात कक्ष आहे. या कक्षातील रुग्ण व त्यांच्या साेबत येणाऱ्या नातेवाइकांकडून उरलेले उष्टे, खरकटे अन्न पदार्थ, घाणपाणी खाली फेकतात. ते कार्यालयात येणाऱ्यांच्या अंगावर पडण्याच्या घटना वरचेवर हाेत असतात. सहा महिन्यांपूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. किरण पाटील यांच्या समाेर असेच पदार्थ पडता पडता वाचले. त्याच प्रमाणे शासकीय आॅडिटरची टीम आलेली असताना त्यांच्या अंगावर पडले हाेते.

१ आॅगस्टला २०२२ राेजी तिसरे पत्र : सीएस कार्यालयाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना पहिले पत्र ३० नाेव्हेंबर २०२१ राेजी देण्यात आले. त्यानंतर ११ फेब्रुवारी २०२२ राेजी स्मरणपत्र देण्यात आले. पुन्हा १ आॅगस्टला २०२२ राेजी तिसरे पत्र देण्यात आले. त्यालाही पाच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. तरीदेखील प्रश्न सुटलेला नाही.

तपासणीसाठी येणाऱ्या दिव्यांगांसाठी रॅम्प तयार करा
जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या दालनात बाहेरून येणाऱ्या अभ्यागतांची माेठी गर्दी असते. त्यासाठी प्रवेशद्वाराच्या समाेरील पाेर्चवर शेड बसवण्यात यावे, पाेर्चमध्ये पेव्हर ब्लाॅक बसवण्यात यावे, अभ्यागतांसाठी बसवण्याची व्यवस्था करण्यात यावा. तपासणीसाठी येणाऱ्या दिव्यांगांसाठी रॅम्प तयार करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहे.

बातम्या आणखी आहेत...