आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासलग १४ वर्षे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा भुसावळच्या राजकारणात भिष्म पितामह म्हणून ओळख असलेले राजेंद्र देवीलाल दायमा (वय ७०) यांचे सोमवारी (दि.१३) अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी (दि. १४) सकाळी ९ वाजता टीव्ही टॉवर परिसरातील राहत्या घरापासून निघेल. ठाण्याचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यानंतर राज्यात सर्वाधिक व सलग १४ वर्षे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणारे ते एकमेव होते.
आनंद दिघेंनंतर सर्वाधिक काळ सांभाळले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक राजेंद्र दायमा यांना उमेदवारी जाहीर झाली होती. प्रचारासाठी खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आले होते. व्यासपीठावर येताच बाळासाहेबांनी दायमांची उमेदवारी रद्द करण्याची घोषणा केली. एवढा मोठा धक्का असतानाही बाळासाहेबांचे आदेश आनंदाने स्वीकारत दुसऱ्याच दिवसापासून दिलीप भोळेंच्या प्रचारासाठी गाडीत फिरले आणि त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. सच्चा, दिलदार आणि कट्टर शिवसैनिक अशी माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा यांची ओळख कायम स्मरणात राहिल. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहिलेले राजेंद्र दायमा यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या रूपाने एकनिष्ठ शिवसैनिक गमावला आहे. दायमा म्हणजे कट्टर शिवसैनिक. परिस्थिती आणि सामाजिक व्यवस्थेत अत्यंत छोट्या समाजात भुसावळात शिवसेनेचे काम केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.