आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारी:विधानसभेसाठी स्वत:ची उमेदवारी रद्द झाल्यावरही दिलीप भोळेंच्या विजयासाठी केले जीवाचे रान ; मंडळावर मिळाली होती संधी

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलग १४ वर्षे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा भुसावळच्या राजकारणात भिष्म पितामह म्हणून ओळख असलेले राजेंद्र देवीलाल दायमा (वय ७०) यांचे सोमवारी (दि.१३) अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी (दि. १४) सकाळी ९ वाजता टीव्ही टॉवर परिसरातील राहत्या घरापासून निघेल. ठाण्याचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यानंतर राज्यात सर्वाधिक व सलग १४ वर्षे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणारे ते एकमेव होते.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक राजेंद्र दायमा यांना उमेदवारी जाहीर झाली होती. प्रचारासाठी खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आले होते. व्यासपीठावर येताच बाळासाहेबांनी दायमांची उमेदवारी रद्द करण्याची घाेषणा केली. एवढा मोठा धक्का असतानाही बाळासाहेबांचे आदेश आनंदाने स्वीकारत दुसऱ्याच दिवसापासून दिलीप भोळेंच्या प्रचारासाठी गाडीत फिरले आणि त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. सच्चा, दिलदार आणि कट्टर शिवसैनिक अशी माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा यांची आेळख कायम स्मरणात राहिल. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहिलेले राजेंद्र दायमा यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या रूपाने एकनिष्ठ शिवसैनिक गमावला आहे. दायमा म्हणजे कट्टर शिवसैनिक. परिस्थिती आणि सामाजिक व्यवस्थेत अत्यंत छोट्या समाजात भुसावळात शिवसेनेेचे काम केले. काम करीत असताना मामा बियाणी यांच्यासारख्या मित्रांबरोबर लहानाचे मोठे झाले आणि काम करताना विधानसभेसाठी स्वत:ची उमेदवारी रद्द झाल्यावरही दिलीप भोळेंच्या विजयासाठी केले राजेंद्र दायमा यांनी जीवाचे रान शिवसेनेच्या प्रवाहात सामिल झाले. माझी व त्यांची मैत्री जवळपास सन १९८९मध्ये झाली. बाळासाहेब ठाकरेंवर निस्सिम प्रेम करणारा माणूस अशी त्यांची ख्याती होती. ‘राजू तुझे तिकीट मी रद्द करतोय’ शिवसेनेची उमेदवारी दायमाजींना जाहीर झाली होती. प्रचारासाठी स्वत: बाळासाहेब व्यासपीठावर उपस्थित होते. त्याचवेळी बाळासाहेब दायमाजींना म्हणतात, ‘राजू तुझे तिकीट मी रद्द करतोय’ आणि दिलीप भोळेंना देत आहे. हे शब्द ऐकून काहीही प्रतिक्रीया न देता आनंदाने स्वीकारून दायमांनी भोळेंचा प्रचार तेवढच्या उत्साहात केला होता. पूर्वीच्या आणि आताच्या राजकरणात व निष्ठेतील हा फरक दिसून येतो. ग्रामपंचायत निवडणुकीत मतभेद झाले तर बोलणे बंद होते. परंतु मोठी संधी हातातून जात असतानाही केवळ बाळासाहेबांचे शब्द प्रमाण मानून त्यांनी काम केले. त्यामुळे तालुकाप्रमुख असलेल्या दायमांवर जिल्हाप्रमुखाची जबाबदारी सोपवली गेली. ...आणि बाळासाहेबांनी दायमांना बक्षिस दिले बाळासाहेब ठाकरेंनी आयोजीत केलेल्या एका बैठकीला मी उपस्थित होतो. त्यावेळी दायमाजी दिसत नसल्याचे जाणवताच राजू नाही आला का? अशी विचारणा करत आवर्जून आठवण काढली. बाळासाहेबांच्या मनात एखाद्या सर्वसाधारण कार्यकर्त्याची काय जागा असते हे दायमाजींनी सिध्द केले. त्याचे बक्षिस म्हणून त्यांची प्रदूषण नियंत्रण मंडळावर नियुक्ती झाली होती. राजेंद्र दायमा यांच्या जीवनात अनेक चढउतार आले. ज्या काळात शिवसेना म्हटले की वेगळ्या अर्थाने बघितले जायचे तेव्हा भुसावळ शहर व कार्यकर्त्यांसाठी त्यांनी काम केले. १९९९च्या विधानसभा निवडणुकीत तिकीटासाठी प्रचंड चढाओढ सुरू होती. त्या वेळी दायमाजींनी खरे, वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला. ते जिल्हाप्रमुख तर होतेच परंतु त्यासोबत मित्र आणि भाऊ होते. असे कार्यकर्ते प्रत्येक पक्षात राहिले तर त्यांची जागा कोणत्याही नेत्यापेक्षा कमी राहू शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...