आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपेक्षा:माजी मंत्री खडसेंना विधान परिषदेवर जाण्याचे वेध, पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मागितल्याची माहिती

जळगाव2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • राज्यपालांवरील आरोपांचे खडसे यांच्याकडून खंडन

विधान परिषदेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी आपण पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. या मागणीवर पक्ष नक्कीच सकारात्मक विचार करून न्याय देईल, अशी अपेक्षा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावात माध्यमांशी बाेलताना व्यक्त केली.

जळगाव येथे आले असता त्यांच्या निवासस्थानी त्यांनी माध्यमांशी बाेलताना विधान परिषदेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील पक्षाच्या नेत्यांनी राज्यसभेसाठी माझ्या नावाची शिफारस केली हाेती. परंतु, मला राज्यसभेवर जाण्याची इच्छा नव्हती. मला राज्याच्या राजकारणातच राहायचे आहे. राज्यातच काम करायची इच्छा असल्याने मला राज्यसभेएेवजी विधान परिषदवर संधी देण्यात यावी, अशी मागणी मी त्यावेळी पक्षश्रेष्ठी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली हाेती. त्यामुळे या वेळी माझ्या मागणीवर नक्कीच सकारात्मक विचार हाेवून मला संधी मिळेल, अशी अपेक्षा माजी मंत्री खडसे यांनी व्यक्त केली. दरम्यान, खडसे यांना पक्ष उमेदवारी देतो का नाही याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे पंकजा यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

राज्यपालांवरील आरोपांचे खडसे यांच्याकडून खंडन

विधान परिषदेच्या रिक्त जागा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांवर हाेणाऱ्या आराेपांचे त्यांनी खंडन केले. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. राज्यपालांना त्यांच्या काेट्यातून विधान परिषद सदस्य निवडीचे संपूर्ण अधिकार आहेत. ताे सर्वस्वी त्यांचा निर्णय असल्याने असले राजकीय आराेप त्यांच्यावर केले जाऊ शकत नसल्याचे माजी मंत्री खडसे या वेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...