आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचे बळी:जळगाव-रावेरचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे कोरोनामुळे निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

जळगाव10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे माजी खासदार आणि जिल्हा अध्यक्ष हरीभाऊ जावळे यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. यावरच उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले आहे. रावेर मतदार संघातील माजी खासदार जावळे यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यांच्या पश्च्यात आई, पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. माजी मंत्री तसेच भाजप आमदार गिरीश महाजन यांनी ही माहिती दिव्य मराठीशी बोलताना दिली आहे.

ट्विटरवर व्हिडिओ जारी करत, चंद्रकांत पाटील म्हणाले की, हरिभाऊ यांच्या जाण्याने पक्षाला मोठे नुकसान झाले आहे. आम्ही अशा दुःद प्रसंगी जावळे कुटुंबासोबत आहोत.

यावल तालुक्यातील भालोद हे त्यांचे मूळ गाव होते. आठवडाभरापूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले होते. उपचार सुरू असतांनाच त्यांच्या मृत्यूची बातमी धडकल्याने जिल्ह्यात शोकाकुल वातावरण आहे. हरिभाऊ जावळे दोन वेळा जळगाव-रावेर मतदारसंघाचे खासदार राहिलेले आहेत. तसेच, रावेरचे आमदारही होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना तिकीट देण्यात आले होते. त्याचवेळी भाजपकडून जावळे यांना तिकीट नाकारले होते. शांत, संयमी, अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्च्यात आई, पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...