आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे सन १९७५च्या जुनी अकरावी बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन कार्यक्रम अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये घेण्यात आला. या विद्यार्थ्यांनी समाजासमोर चांगला आदर्श घालून देत दरवर्षी या शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्याची मदत करण्याचे जाहीर केले. माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी १९७५च्या बॅचचे शिक्षक सलीम इब्राहिम होते. स्नेहमेळाव्यात माजी इकबाल बेग मिर्झा यांनी आपण सर्व माजी विद्यार्थ्यांनी मिळून दरवर्षी विद्यालयातील होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य देण्याचा प्रस्ताव मांडला.
हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीत सागीर अहमद शेख, प्रा. इक्बाल बेग मिर्झा, युनूस रिजवी, गुलाब हैदर यांचा समावेश आहे. तत्कालीन प्राचार्य सागीर अहमद शेख यांनी जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात आपले आरोग्य सांभाळावे व आपल्या जकातीचा काही भाग आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतील सध्या शिकत असलेल्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांवर खर्च करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली. हा उपक्रम तीन-चार वर्षांपासून सुरू असल्याचे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.