आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूर्दंड:सिव्हिलच्या रुग्णांचीच महालॅबमध्ये तपासणी

जळगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा सामान्य रुग्णालयाने कोरोना काळात हिंद महालॅब सोबत करार केला होता. या लॅबमध्ये जीएमसीत येणाऱ्या सर्व रुग्णांच्या तपासण्या केल्या जात होत्या. मात्र, जिल्हा रुग्णालयाने जीएमसीत येणाऱ्या रुग्णांच्या तपासण्या येथे करण्यास मनाई करत फक्त जिल्हा रुग्णालयांतर्गत येणाऱ्या एनआयसीयू, डायलिसिस व डीइआयसी सेंटरमधील रुग्णांच्याच तपासण्या कराव्या याबाबत पत्र दिले आहे. शनिवारपासून जीएमसीत येणाऱ्या रुग्णांच्या तपासण्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना आता भूर्दंड सहन करावा लागणार आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातर्फे जिल्हा रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला चालवण्यासाठी दिले आहे. त्यामुळे या अंतर्गत विविध सुविधा एकत्रित पुरवण्यात येतात. रुग्णांच्या कमी दरात तपासण्या करण्यात याव्या यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाने महालॅब सोबत करार केला होता. त्या अंतर्गत थायरॉइड, प्रोटिन, कॅल्शियम, किडनी व तापाच्या प्रमाणाची तपासणी या ठिकाणी करण्यात येत होती. दररोज शंभराहून अधिक रुग्ण याठिकाणी यायचे.

बातम्या आणखी आहेत...