आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजभवन येथे राज्यपाल यांच्या हस्ते सन्मान:चांडक कॅन्सर केअर हॉस्पिटलला एक्सलेन्स इन ऑन्कोलॉजी अवॉर्ड

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खान्देशात कॅन्सरच्या रुग्णांना उत्कृष्ट सेवा व कॅन्सर प्रति जनजागृती केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे चांडक कॅन्सर केअर हॉस्पिटलला ‘एक्सलेन्स इन ऑन्कोलॉजी’ हा अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.कॅन्सर सर्जन डॉ. नीलेश चांडक यांनी चांडक कॅन्सर हॉस्पिटल जळगाव सारख्या छोट्या शहरात सुरू करून कॅन्सरविषयी जनजागृती करून मुंबई, पुण्यासारख्या अत्याधुनिक सुविधा तसेच उपचार जळगावमध्ये उपलब्ध करून दिले आहेत.

आजपर्यंत पाच हजार पेक्षा जास्त रुग्णांवर क्लिष्ट सर्जरी व हजारो जनजागृतीपर शिबिराला डॉ. चांडक यांनी संबोधित केले आहे. डॉ. चांडक यांनी जळगाव, अकोला येथील सिव्हिल हॉस्पिटल येथेही कॅन्सरग्रस्त गरीब रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. त्यांनी केलेल्या या उत्कृष्ट कार्याबद्दलच त्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. डॉ. चांडक हे छोट्या शहरात राहून कॅन्सर रुग्णांना नवसंजीवनी देत आहे. त्यांचे हे कार्य सगळ्यांसाठी प्रेरणादायी व अनुकरणीय असल्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...