आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेपनीय अहवाल:ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तपासणीमुळे खळबळ

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना साथीच्या काळात खासदार रक्षा खडसे यांच्या निधीतून विविध ग्रामीण रुग्णालयांना यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली होती. त्याची पडताळणी सुरू झाली आहे. यावल ग्रामीण रुग्णालयात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने येथे प्राप्त १६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची तपासणी केली. हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे विनावापर खोक्यात बंद होते. यापू्र्वी रावेर येथेही तपासणी झाली होती. या सर्व ठिकाणचा गाेपनीय अहवाल सोमवारी पथक शासनाला देईल.

गेल्या वर्षी कोरोना संकटात ऑक्सिजन पुरवठा मंदावला होता. त्या वेळी पर्यावरणातून नैसर्गिक रित्या ऑक्सिजन संकलनासाठी खासदार रक्षा खडसे यांच्या स्थानिक विकास निधीतून ग्रामीण रुग्णालयांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वितरित करण्यात आले होते. याबाबत जिल्हा नियोजन मंडळाकडे तक्रार प्राप्त झाली होती. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वितरित झालेले नाहीत, त्यांचे कागदोपत्री वाटप झाले. त्यात गैरप्रकारांचे आरोप होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी अचानक यावल रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...