आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरीश महाजनांचे खळबळजनक वक्तव्य:एकनाथ खडसेंच्या मुलाची आत्महत्या झाली की खून हे तपासणे गरजेचे

जळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘ते माझ्या मुलाबाळांवर जात असतील तर आ. एकनाथ खडसंेना एक मुलगा होता. ३२ व्या वर्षी त्याला काय झाले? कुणामुळे झाले, हाही संशोधनाचा विषय आहे. तुमच्या मुलाचे काय झाले? आत्महत्या झाली की खून झाला, हे तपासण्याची गरज आहे,’ असे खळबळजनक वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले. मला जास्त बोलायला लावू नका, त्यातच तुमचे भले आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

खडसे आणि मंत्री महाजन यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत. गिरीश महाजनांना दुर्दैवाने मुलगा नाही. तो असता तर आमदार झाला असता सूनही आमदार झाली असती, अशी टीका खडसे यांनी जामनेर येथे एका कार्यक्रमात केली होती. त्याला महाजन यांनी वरील प्रत्युत्तर दिले.

महाजनांचे वक्तव्य नीच मनोवृत्तीचे प्रदर्शन ^महाजन यांचे वक्तव्य नीच मनोवृत्तीचे प्रदर्शन करणारे आहे. त्यांच्या मुलाबाळांविषयी बोललो नाही. त्यांच्या पत्नी २७ वर्षांपासून पदावर आहेत. मुलगा व सून असती तर तेही राजकारणात आले असते,असे बोललो होतो. फर्दापूर येथील रेस्ट हाऊसवर काय झाले होते हे सर्वांना माहिती आहे. त्यांचे अनेक व्यक्तींशी किती प्रेमाचे संबंध आहेत. हेही सर्व जाणतात. विशिष्ट समाजाला टार्गेट करून समाजाचे नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मृत मुलाविषयीच्या वक्तव्याने वेदना झाल्या. -एकनाथ खडसे, आमदार, राष्ट्रवादी

बातम्या आणखी आहेत...