आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅटच्या जिल्हाध्यक्षपदी संजय शहा:लवकरच जिल्हास्तरावर कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या व्यापाऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी संजय शहा यांची निवड करण्यात आली आहे. कॅट महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ अध्यक्ष महेश बकाई, सचिन निवगुणे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी यांनी संजय शहा यांना जळगाव जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची सूत्र सोपविली. याप्रसंगी संजय शहा यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व व्यापारी बांधवांना संघटीत होऊन काम करण्याचे आवाहन केले. लवकरच जिल्हास्तरावर कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे.

तसेच तालुकास्तरावर सुध्दा अध्यक्ष व कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे. याप्रसंगी राज्य सचिव दिलीप गांधी, प्रविण पगारीया, संगीता पाटील उपस्थित होते. कॅट ही संघटना व्यापाऱ्यांना स्थानिक, राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्तरावरील येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असते. ई-कॉमर्स कंपन्यांचे धोरण, जीएसटीमधील अनावश्यक कायदे, एफ एफ एस ए आय, स्थानिक कर प्रणाली व व इतर अनेक समस्या सोडवण्यासाठी काम करत असते.

बातम्या आणखी आहेत...