आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताच्या सर्व भाषांमधील संस्कार आणि मानवीमूल्य सारखेच असून, अनुवादाची दीर्घ परंपरा लाभलेली आहे. त्यामुळे ही परंपरा टिकवण्यासाठी देशात अनुवाद विद्यापीठ उभारायला हवे, असे प्रतिपादन दिल्ली विद्यापीठातील भारतीय अनुवाद परिषद या संस्थेचे सचिव तथा प्रसिद्ध अनुवाद पत्रिकेचे संपादक प्रा. पी. सी. टंडन यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळेतील हिंदी विभाग व महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अनुवादित साहित्य : अतीत, वर्तमान और भविष्य’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात बीजभाषण करताना प्रा. टंडन बोलत होते. महात्मा गांधी आतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश शुक्ल हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. हिंदी विभागप्रमुख प्रा. सुनील कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. हे चर्चासत्र ऑनलाइन व ऑफलाइन झाले. प्रा. रजनीश शुक्ल म्हणाले की, भारतीय भाषेतील विपुल ज्ञानप्रसारासाठी अनुवाद कला महत्त्वाची आहे. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे सहसंचालक डॉ. सचिन निंबाळकर यांनी प्रास्ताविकात अकादमीच्या उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख पाहुण्या व भाषा प्रशाळेच्या संचालक डॉ. मुक्ता महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.
विविध सत्रांचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. प्रीती सोनी, डॉ. सविता चौधरी, डॉ. पुरुषोत्तम पाटील, प्रा. विजय लोहार, प्रा. संजय रणखांबे,डॉ.रूपाली चौधरी, डॉ. गजानन वानखेडे, डॉ. दत्तात्रय येडले यांनी केले. संयोजक प्रा. सुनील कुलकर्णी यांनी आभार मानले. राष्ट्रीय चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी आयाेजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.