आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामालमत्ता करापाेटी असलेली सुमारे अडीचशे काेटींची थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने थकबाकीदारांसाठी एकेक संधी उपलब्ध करून दिली आहे. सलग दुसऱ्यांदा अभय याेजनेला मुदतवाढ देत प्रशासनाने कारपेट अंथरले आहे. यातून मनपाच्या तिजाेरीत दरराेज दीड ते दाेन काेटींचा भरणा हाेत आहे. थकबाकीदारांनाही ३० ते ६० टक्के सूट मिळत आहे. महापालिकेचे २०२२-२३ या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीचे टार्गेट ९० काेटी निश्चित करण्यात आले आहे. आतापर्यंत ७५ काेटींची वसुली चालू आर्थिक वर्षात टार्गेटपर्यंत पाेहाेचण्यासाठी २५ दिवसांत आणखी १५ काेटींची वसुली करावी लागणार आहे.
दरम्यान, थकबाकीदारांनी गेल्या आठवडाभरात चांगला प्रतिसाद दिल्याने मनपाच्या तिजाेरीत अभय याेजना सुरू केल्यापासून सुमारे १५ काेटींचा भरणा झाला हाेता. महापाैर जयश्री महाजन व नगरसेविका अॅड. शुचिता हाडा यांनी दिलेल्या पत्राची दखल घेत आयुक्त डाॅ. विद्या गायकवाड यांनी सुरुवातीला पाच दिवसांची मुदत वाढवल्यानंतर आता ६ मार्चपासून १५ मार्चपर्यंत आणखी दहा दिवसांची मुदत वाढवली आहे. त्यामुळे अभय याेजनेत सूट मिळवण्याची आणखी एक संधी करदात्यांना मिळाली आहे. यामुळे थकबाकीदारांना त्यांच्याकडील मागणीच्या रकमेत ३० ते ६० टक्के सूट मिळवता येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.