आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट कार्ड नसल्यास पूर्ण तिकीट:1 जुलैपासून निर्णयाची अंमलबजावणी; एजंटांना विभागातील आगारामध्ये देणार जागा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर व संपानंतर एसटी महामंडळ मार्गावर येत आहे. महामंडळाने ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र, 1 जुलैनंतर सवलतधारक प्रवाशांना स्मार्ट कार्ड नसल्यास पूर्ण तिकीट घेणे बंधनकारक राहणार आहे. यात खासगी एजंटांना देखील विभागातील आगारात जागा देण्यात येणार असल्याने स्मार्ट कार्ड काढण्याला चालना मिळणार आहे.

राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून 29 सामाज घटकांना प्रवासी भाड्यात 33 ते 100 टक्क्यांपर्यंत सवलत देते. ही सवलत मिळवण्यसाठी पात्र लाभार्थींकडे एसटीचे स्मार्ट कार्ड असणे अनिवार्य आहे. मात्र, अनेक आगारात कोरोना व एसटी संपामुळे नोंदणीच झालेली नाही. मात्र, आता खासगी एजंटांना देखील नोंदणीसाठी एसटी आगारांत जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ज्येष्ठ नागरिक व इतर सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रियेला चालना मिळेल.

पाचव्यांदा मुदतवाढ

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 23 मार्च 2020 पासून राज्यासह देशभरात लॉकडाऊन असल्याने महामंडळाने सुरुवातीला स्मार्ट कार्ड योजनेला 14 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब यांनी 30 नोव्हेंबरपर्यंतच मुदतवाढ दिल्याची घोषणा करून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा दिला होता. त्यानंतर वाहतूक महाव्यवस्थापक यांनी 31 डिसेंबरपर्यंत तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली. त्यानंतर पुन्हा 31 मार्चपर्यंत चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती. तर आता 30 जून ही पर्यंतही मुदत वाढ देण्यात आली आहे.

अशी आहे कार्डधारकांची संख्या

विभागात 71 हजार 566 कार्ड धारकांमध्ये 14 हजार 201 कार्ड वाटप करण्याचे बाकी आहेत. यात ज्येष्ठ नागरिकाची संख्या फार कमी आहे. विद्यार्थी कार्डधारकांचीच संख्या अधिक आहे. तर एजंटांकडून आतापर्यंत 1 लाख 75 हजार 375 स्मार्ट कार्ड काढण्यात आली आहेत. यातील 1 लाख 51 हजार 299 कार्ड ज्येष्ठांना वाटप करण्यात आली असल्याने आता केवळ 24 हजार 76 स्मार्ट कार्ड त्यांच्याकडे पडून आहेत.

विभाग नियंत्रक म्हणाले...

विभाग नियंत्रक भगवान जगनोर म्हणाले की, 1 जुलैपासून स्मार्ट कार्डशिवाय सवलत धारकांना एसटी महामंडळाच्या बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करता येणार नाही. त्यामुळे उर्वरित दिवसात पात्र ज्येष्ठ नागरिकांसह इतर सवलत धारकांनी आपले स्मार्ट कार्ड काढून घेऊन आपली गैरसोय टाळावी. तसेच ज्या सवलतधारकांनी स्मार्ट कार्ड काढली असतील व अजूनही ती आगारातून नेली नसतील. त्यांनी संबंधित आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधून स्मार्ट कार्ड घेऊन जावी.

बातम्या आणखी आहेत...