आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ:विधी, शिक्षणशास्त्र सीईटी नोंदणीसाठी 22 पर्यंत मुदतवाढ ; जूनपर्यंत नोंदणी करता येणार

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. ऑगस्टमध्ये होणाऱ्या सीईटी परीक्षांना सामोरे जाण्याची अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी सीईटी सेलने नोंदणीसाठी मुदत वाढवली आहे. या अंतर्गत विधी व शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी २२ जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे. तर एम.पीएड अभ्यासक्रमासाठी ७ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विधी शाखेतील पदवीनंतर एलएलबी ३ वर्ष आणि बारावीनंतर एलएलबी ५ वर्ष या दोन्ही शिक्षणक्रमाच्या सीईटी नोंदणीसाठी २२ जूनपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. तसेच शिक्षणशास्त्र विद्याशाखेतील बी. एड, एम. एड हा इंटिग्रेटेड पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम, एम. एड, बी. एड, बीएस्सी. बीएड हा संयुक्त पदवी अभ्यासक्रम, बी.पीएड अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी २२ जूनपर्यंत नोंदणी करता येईल. एम.पीएड या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी ७ जुलैपर्यंत मुदत आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या प्रवेशासाठी होत असलेल्या या प्रक्रियेतंर्गत शिक्षणशास्त्र व विधी शाखेतील अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा नोंदणीसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता या नोंदणी प्रक्रियेला प्रतिसाद मिळण्यास सुरूवात झाली आहे. विद्यार्थ्यांनी मुदतीत नोंदणी करावी.

बातम्या आणखी आहेत...