आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधी शिक्षणशास्त्र सीईटी नोंदणी:22 पर्यंत मुदतवाढ, एमपीएड अभ्यासक्रमासाठीही 7 जुलैपर्यंत करता येईल नोंदणी

जळगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. ऑगस्टमध्ये होणाऱ्या सीईटी परीक्षांना सामोरे जाण्याची अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी मिळावी, यासाठी सीईटी सेलने नोंदणीसाठी मुदत वाढविली आहे. या अंतर्गत विधी व शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी 22 जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे. तर एम.पीएड अभ्यासक्रमासाठी 7 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

विधी शाखेतील पदवीनंतर एलएलबी 3 वर्ष आणि बारावीनंतर एलएलबी 5 वर्ष या दोन्ही शिक्षणक्रमाच्या सीईटी नोंदणीसाठी 22 जूनपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. तसेच शिक्षणशास्त्र विद्याशाखेतील बी.एड, एम.एड हा इंटिग्रेटेड पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम, एम.एड, बी.एड/बीएस्सी.बीएड हा संयुक्त पदवी अभ्यासक्रम, बी.पीएड अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी 22 जूनपर्यंत नोंदणी करता येईल.

नोंदणी प्रक्रियेला प्रतिसाद

तर एम.पीएड या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी 7 जुलैपर्यंत मुदत आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या प्रवेशासाठी होत असलेल्या या प्रक्रीयेतंर्गत शिक्षणशास्त्र व विधी शाखेतील अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा नोंदणीसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता या नोंदणी प्रक्रियेला प्रतिसाद मिळण्यास सुरवात झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...