आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक दृष्टिदान दिन:आतापर्यंत 535 व्यक्तींचे नेत्रदान; सहा हजार व्यक्तींचा नेत्रदानाचा संकल्प

जळगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी’ या घोषवाक्याचा आधार घेत डोळ्यांविषयी काळजी घेत अंध व्यक्तींना नेत्रदान करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जगभर प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने जळगावातही जनजागृती करण्यात येत आहे. जळगाव शहरात गेल्या २३ वर्षांत ५३५ व्यक्तींनी नेत्रदान केले आहे. २४० व्यक्तींवर नेत्ररोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली असून, सुमारे सहा हजार व्यक्तींनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे.

जिवंतपणी कोणालाही कायद्यानुसार नेत्रदान करता येत नाही. ज्या व्यक्तीला डोळ्याचे रोपण करण्यात आले आहे त्या व्यक्तीलाही कोणाचे डोळे मिळाले आहेत हे सांगितले जात नाही. भारतात सुमारे ६८ लाख व्यक्तींच्या एका डोळ्याच्या बाहुलीचा पडदा अस्पष्ट झाल्याने ते एका डोळ्याने अंध आहेत तर त्यातील जवळजवळ दहा लक्ष व्यक्ती दोनही डोळ्यांचे बाहुलीचे पडदे अस्पष्ट झाल्याने अंध आहेत. बाहुलीच्या पडदा रोपणाने या लाखो अंधव्यक्तींना दृष्टी प्राप्त होत आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून मृत्यूनंतर नेत्रदान करून या जागतिक दृष्टिदान चळवळीत नागरिकांनी सहभागी व्हावे, या हेतूने जनजागृती करण्यात येत आहे. जळगाव शहरात मांगीलाल बाफना नेत्रपेढी याठिकाणी नेत्रदान केले जाते.

एक वर्ष वय असलेली व्यक्तीही करू शकते नेत्रदान
एक वर्ष वय असलेली कोणतीही व्यक्ती आपले नेत्रदान करू शकते. जिवंत असताना आपले डोळे दान करण्यासाठी इच्छापत्र लिहून दिल्यास मृत्यूनंतर अशा व्यक्तीचे डोळे दान होऊ शकतात. इच्छापत्र लिहून दिले असल्यास त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाइकांनी मृत व्यक्तीच्या इच्छेचा आदर ठेवून कार्यवाही करायला हवी. मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह, चष्मा वापरत असणारी व्यक्ती देखील नेत्रदान करू शकते.

मृत्यूनंतर अवघ्या सहा तासांत नेत्र जमा करणे गरजेचे नेत्रदानाबद्दल नागरिकांमध्ये अजून देखील जनजागृती होणे गरजेचे आहे. नेत्रदानानंतर बाहुलीच्या पडद्याचे रोपण ही एक शस्त्रक्रिया आहे. त्या शस्त्रक्रियेद्वारे अस्पष्ट बाहुलीच्या पडद्याऐवजी दान केलेल्या व्यक्तीच्या डोळ्यातील सुस्पष्ट बाहुलीचा पडदा बसवण्यात येतो. मृत्यूनंतर जास्तीत जास्त ६ तासांत मृत व्यक्तीचे डोळे नेत्र बँकेत जमा करणे आवश्यक आहे. - डॉ. धर्मेंद्र पाटील, प्रकल्प प्रमुख, मांगीलालजी बाफना नेत्रपेढी

बातम्या आणखी आहेत...