आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्य संशयिताला अटक:अल्पवयीनांच्या मदतीने फाेडले ज्वेलर्सचे दुकान; मुद्देमाल केला हस्तगत

जळगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगावातील सराफा बाजारातील मनीष ज्वेलर्स फाेडून २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या संशयीताला स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी शहरातील पिंप्राळा हुडको येथून अटक केली. विशाल उर्फ ॲस्टीन युवराज सोनवणे (वय २७, रा. भिलवाडी ता. जळगाव) असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने इतर तीन अल्पवयीन मुलांच्या मदतीने ही चोरी केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली.

सराफ बाजारातील मनिष ज्वेलर्स फोडून चोरट्यांनी २ लाख ३० हजारांचा ऐवज लांबवल्याची घटना ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता समोर आली होती. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही चोरी भिलवाडी येथील संशयित विशाल उर्फ ऑस्टिन युवराज सोनवणे याने केल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली.

त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे, पोलिस हेडकॉन्स्टेबल विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, विजय शामराव पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, रवी नरवाडे, संतोष मायकल, महेश महाजन, सुरज पाटील, अविनाश देवरे, जयंत चौधरी, संदीप सावळे, उमेश गोसावी, राहुल बैसाणे यांच्या पथकाने १० नोव्हेंबर रोजी दुपारी संशयित विशाल सोनवणे यास पिंप्राळा येथून अटक केली आहे. यात तीन अल्पवयीन साथीदार पोलिसांनी निष्पन्न केले असून चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पुढील कारवाईसाठी शनीपेठ पोलिसांच्या ताब्यात संशयिताला दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...