आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओबीसी आरक्षणावर बोलणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना जनाची नाही तर कमान मनाची लाज असायला हवी, अशी जहरी टीका सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. जळगावमध्ये बोलतांना मुंडे म्हणाले की, भाजपच्या विचारधारेतच आरक्षण नाही, अशा विचारधारेने आम्हाला सांगावे की आम्ही ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहोत. असे म्हणत धनंजय मुंडे यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.
राज्यात ओबीसी आरक्षण प्रकरण चांगलेच तापले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक दोन आठवड्यात द्या असे निर्देश दिले आहेत. अशात मुंबईत देवेंद्र फडणवीस यांनीही भाजप ओबीसी मोर्चाच्या बैठकीत आज महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
लोकांचा बुद्धीभेद करणे ही भाजपची पद्धत - धनंजय मुंडे
जी लोक म्हणतात, मविआमुळे ओबीसी आरक्षण गेले. त्यांना खरेतर जनाची नाही तर मनाची लाज असायला हवी, असा टोला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. कारण भाजपच्या विचारधारेत आरक्षण नाही, त्यांनी आम्हाला सांगावे की आम्ही ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहोत, असे मुंडेंनी म्हटले आहे.
दरम्यान मागच्या पाच वर्षांच्या काळात भाजपच्या राज्यातील आणि केंद्रातील सरकारने आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात केस चालू होती. त्यावेळी जो इम्पेरिकल डेटा देणे अपेक्षित होते ते दिले नाही. हा ओबीसींचा डेटा केंद्र सरकारने दिला नाही. त्यामुळे खरतंर हे भाजपचे अपयश आहे. आज आम्हाला ते जबाबदार धरत आहेत. निकाल लागल्यानंतर ते आमच्यावर जबाबदारी टाकत आहेत हे चुकीचे आहे. लोकांचा बुद्धीभेद करणे ही भाजपची पद्धत आहे आत्ताही ते आरक्षणाच्या मुद्द्यावर तेच करत आहेत.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते ?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण ठाकरे सरकारमुळे गेले, आरक्षण गेले नाही तर त्यांचा मुडदा पाडला आहे, असा आरोप केला आहे. सरकारकडून आरक्षणाला संरक्षण दिल्याचा बुरखा फाडला पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. मंडल आयोगाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.