आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ खडसेंचा मोठा दावा:युती तोडण्याचा निर्णय फडणवीस यांचाच; शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणूनच युती तोडली

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप युती तुटल्यानेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. युती तोडण्याचा निर्णय आधीच झाला होता, मी केवळ त्यांची घोषणा केली, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी केला आहे. त्यावेळी युती तोडली नसती तर मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला असता, असेही खडसे यांनी सांगितले.

काय म्हणाले खडसे?

आ. एकनाथ खडसे म्हणाजले की, 2014 विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता. मात्र, तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी युती तोडण्याचा निर्णय घेतला होता. या सर्व प्रकियेत देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आग्रही होती, असा खळबळजनक दावा एकनाथ खडसेंनी केला आहे. यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आमची नैसर्गिक युती होती, असे जाहीर वक्तव्य मविआ सरकार कोसळताना केले होते. यानंतर आता एकनाथ खडसेंच्या वक्तव्याने राजकीय वातावरण पुन्हा तापणास अशी चिन्हं दिसून येत आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री असता

शिवसेना आणि भाजप युतीत ठरल्याप्रमाणे भाजप दिल्ली पाहणार आणि शिवसेना महाराष्ट्र पाहणार, असे बाळासाहेबांनी भाजपला सांगितले होते. त्यातच युती तोडली नसती तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता, हे लक्षात आल्यानेच देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत युती तोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि स्वत: मुख्यमंत्री झाले, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी केला आहे. आता या प्रकरणावरून आज शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वातावरण तापण्याची शक्यता

शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केले. शिवसेनेतील दोन्ही गटांनी शिवसेना आपली असल्याचा दावा केला आहे. तर खडसे यांच्या या विधानामुळे शिवसेना-भाजपमध्ये आणखी राजकीय युद्ध चिघळण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...