आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Farmers' Anger At Officials Over Land Acquisition Rate For Railway Line; Allegations Of Non sending Of The Proposal By The Farmers Sangharsh Committee Warning Of Agitation

शेतकरी संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा:रेल्वेलाईनसाठीच्या भूसंपादन दराबाबत शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांवर रोष; प्रस्ताव न पाठविल्याचा आरोप

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चौथ्या रेल्वेलाईनसाठी भुसावळ तालुक्यातील साकेगाव व सुनसगाव येथील भूसंपादनाबाबत निवाड्याची प्रक्रिया करताना प्रांत अधिकाऱ्यांनी जमिनीचे मूल्य ठरवण्यासाठी नगररचना विभागाच्या सहायक संचालकांची मंजुरी घेतली नाही.

रेडीरेकनर दर हे बिनशेती योग्य दर्जाचे असताना हेतुपुरस्सर बिनशेती दर दिला नसल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समितीने केला केला.त्या निषेधार्थ सोमवारी समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

संपादित क्षेत्रापैकी गट क्रमांक 387।1 मधील प्लॉट क्रमांक 17 व 18 आणि गट क्रमांक 382।1।2 ब मधील प्लॉट क्रमांक 20 हे सुध्दा त्या प्रस्तावानुसार संपादित झालेले आहेत. संपादन क्षेत्रातील गटांपैकी काही गटांचे रेडीरेकनर हे बिनशेती योग्य दर्जाचे आहेत. प्रस्तावात संबंधीत अधिकाऱ्यांनी हेतूपुरस्सर बिनशेती दर दिलेला नाही. जमिनीचा रेडीरेकनरनुसार जास्तीत जास्त दर मिळाला असता म्हणून त्या शेतकऱ्यांचा प्रस्ताव नगररचना विभागाकडे पाठवला गेलेला नाही.हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. नगररचना विभागाचे सहायक संचालक जे दर निश्चीत करतील, ते शेतकरी हिताच्या दृष्टीकोनातून विचारात घेण्यात यावेत. त्या शेतकऱ्यांच्या जमिनीला लागून असलेल्या क्षेत्राला वाघूर पाटचारीच्या प्रस्तावानुसार 20 लाख 1 हजार 351प्रती हेक्टरी मोबदला दर सन 2017 या वर्षीच्या मूल्यांकनानुसार मंजूर केलेला आहे. या गटांना चार वर्षानंतर 2021 सालच्या मुल्यांकनानुसार आता 8 लाख 49 हजार 275 मोबदला दर मंजूर केला आहे.ही बाब अन्यायकारक असून हा दर बदलून मिळणे आवश्यक आहे. शासनाकडून एकाच जमिनीला सन 2017 मध्ये जो मूल्यांकन दर दिलेला आहे.

त्या मूल्यांकन दरापेक्षा अडीच पटीने कमी मूल्यांकन दर चार वर्षांनी ही बाब कर्जाबाजारी शेतकऱ्यांसाठी आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. हा अन्याय दूर झाल्याशिवाय प्रस्तावातील मंजूर झालेली मोबदला रक्कम एकजुटीने कदापी स्विकारणार नाही. या मुद्यांवर आधारित प्रस्ताव सहाय्यक नगररचना संचालक यांच्याकडे अभिप्रायासाठी सादर करावा,अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीचे रवींद्र पाटील, गोपिचंद पाटील, प्रकाश चौधरी, वासुदेव कोळी, कैलास बोरसे, विठ्ठल चिंचोरे, साहेबराव पाटील आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...