आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे तक्रार:पीक नुकसानीचे मिळणार होते 39 हजार, विमा कंपनीने दिली हेक्टरी दीड - 2 हजार नुकसान भरपाई

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईची संरक्षित रक्कम 39 हजार रुपयांपर्यंत होती. या हंगामात काढणी पश्चात झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना केवळ हेक्टरी दीड ते 2 हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्यात आली आहे. त्याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.

असोदा येथील शेतकरी किशोर चौधरी यांनी खरीप हंगामात सोयाबीन या पिकाचा 2 हेक्टरवरील विमा काढला होता. त्याची संरक्षित रक्कम 39 हजार रुपये एवढी होती. त्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचे काढणी पश्चात नुकसान झाले. पंचनाम्यामध्ये शंभर टक्के नुकसानग्रस्त क्षेत्र दाखवण्यात आले होते. विमा कंपनीच्या प्रतिनिधीनेही तशी नोंद केली होती. नुकतीच त्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची 2 हजार 100 रुपये जमा करण्यात आले आहेत. उडीद पिकालाही दीड हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. असोदा परिसरातील 50 शेतकऱ्यांना दीड ते 2 हजार रुपयांदरम्यान नुकसान भरपाई मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबाबत त्यांनी कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांच्याकडे तक्रार केली.

खरीप हंगाम तसेच पुनर्रचीत फळपिक विम्याच्या रकमेबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने कृषी विभागाने विमा कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे. प्रलंबीत असलेली नुकसान भरपाईही मंजूर

पुनर्रचीत हवामान आधारित फळ पीक विमा योजना एआयसी विमा कंपनी यांच्यामार्फत राबवण्यात येत आहे.यामध्ये केळी,आंबा,मोसंबी व डाळींब या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे.फळपिक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरीता या योजनेमध्ये 554.89 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून 50 हजारावर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम कंपनीमार्फत जमा करण्यात आली आहे.

केळी पिकाच्या वारा या हवामान धोके अंतर्ग्त 54 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले असून ही रक्कमही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. तसेच आंबा, मोसंबी, पपई व डाळींब या पिकांचे हवामान धोके नुसार 84.17 लाख रुपये मंजूर झाले असून 364 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...