आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना:कर्जाच्या जाचाला कंटाळून वडली येथील शेतकऱ्याने कुटुंबासह केले विषप्राशन!पत्नी व मुलाची प्रकृती गंभीर

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जिल्ह्यातील वडली गावात धक्कादायक घटना घडली आहे. एकीकडे अवकाळीने शेतकऱ्यांचे हाल केले असतानाच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांने पत्नी मुलासह विषारी रसायन सेवन केले. ही घटना गुरुवारी सकाळी ७:३० वाजता घडली.

विषारी रसायन पिल्यानंतर शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. नारायण दंगल पाटील (वय ६६)असे या शेतकऱ्याचे नाव आहे. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणारा शेतकरी हा अल्पभुधारक होता. या शेतकरी कुटुंबाकडे जेमतेम जमीन असून अतिवृष्टीमुळे कमी आलेले उत्पन्न, घरात बेरोजगारीने त्रस्त झालेला मुलगा या सर्व दृष्टचक्रात हे शेतकरी कुटुंबिय सापडले आहेत त्यातून त्यांनी हे दुर्दैवी पाऊल उचलले. या शेतकऱ्याकडून कर्जाची परतफेड होऊ शकली नाही अशी माहीतीही समोर आली आहे.

जळगाव तालुक्यातील वडली येथील शेतकरी नारायण दंगल पाटील (वय ६६) हे पत्नी भारती नारायण पाटील (वय ६०) व मुलगा गणेश नारायण पाटील (वय २४) यांच्या समवेत वास्तव्याला आहेत. गुरुवारी सकाळी ७:३० वाजता हा प्रकार उघडकीस आला.

नारायण पाटील यांचा पुतण्या श्यामकांत पाटील यांनी तत्काळ तिघांना एका खासगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यात उपचारादरम्यान नारायण पाटील यांचा मृत्यू झाला. तर मुलगा गणेश व पत्नी भारती यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर डाॅक्टरांकडून शर्थीचे उपचार सुरू आहेत. तूर्त या घटनेची नोंद स्थानिक पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.