आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउज्ज्वल स्प्राऊटर स्कूलतर्फे महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आली. नृत्य, कविता, नाटक सादरीकरणही रंगले. फॅशन शो, खेळ, उखाणा फेरी आणि प्रश्नमंजूषा फेरी घेण्यात आली. ३५०पेक्षा अधिक महिलांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या विजेत्या अर्चना पाटील ठरल्या. त्यांचा पैठणी देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेत द्वितीय क्रमांक सुरेखा येवले तर तृतीय क्रमांक कोमल आहुजा यांनी पटकावला. शाळेच्या शिक्षिकांसाठीही होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आली. प्रथम क्रमांक अनघा जोशी, द्वितीय शुभांगी जाधव तर तृतीय क्रमांक सोनल राणे यांनी पटकवला.
शाळेच्या शिपाई गटातून सविता लोखंडे प्रथम, रोहिणी सोनार द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. सर्व विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. कविता, नृत्य तसेच इतर विविध खेळांमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या महिलांनाही विविध पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. यात २५० महिलांनी पारितोषिके पटकावली. होम मिनिस्टर स्पर्धेचे परीक्षक डॉ. रेणुका चव्हाण, निशिका रंगलानी यांनी काम पाहिले. विविध खेळांचे नियोजन क्रीडा शिक्षक विजय विसपुते, ललित लोहार यांनी केले. कार्यक्रम अध्यक्षा अनघा गगडाणी, विश्वस्त प्रवीण गगडाणी, मुख्याध्यापिका मानसी गगडाणी यांच्या मार्गदर्शनात झाला. अनघा जोशी, पद्मजा घैसास यांनी सूत्रसंचालन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.