आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी दाम्पत्याचे उपोषण:पत्नीचा स्वातंत्र्य दिनी आत्मदहनाचा प्रयत्न; शेतमाल खरेदीत फसवणुकीचा आरोप

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण समारंभावेळी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या जामनेर तालुक्यातील दाम्पत्याने पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. नेरी बुद्रुक येथील महिलेच्या पतीविरुध्द शेतमाल खरेदीत फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. यात जामनेर पोलिस गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप केलेल्या व्यापाऱ्यांनीही महिलेच्या पतीला शेतमालाचे पैसे दिल्याचा दावा केला आहे.

गेल्या महिनाभरापासून नेरी बुद्रुक येथील महिलेने पतीसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सिु केले. स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाच्या प्रयत्नानंतर त्या महिलेला पतीसह ताब्यात घेण्यात आले. उपोषण मंडपही गुंडाळण्यात आला. त्यानंतरही मंगळवारी पुन्हा या दाम्पत्याने उपोषणाला सुरुवात केली आहे.

शेतमाल परस्पर विकून आर्थिक फसवणूक

जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक येथील वंदना सुनील पाटील या महिलेने स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदनाचा प्रयत्न केला. जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या महिला कर्मचाऱ्यांनी त्यांना आत्मदहन करण्यापासून रोखले. त्यावेळी त्यांनी जामनेर पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली. जामनेर पोलिस ठाण्यातील प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांना निलंबीत करण्याची मागणी केली. जामनेर ईश्वरलाल किसनलाल कोठारी, अतुल सुरेश कोठारी व सुरेश किसनलाल कोठारी यांनी पतीचा सोयाबीन, मका हा शेतमाल परस्पर विकून आर्थिक फसवणूक केली.

प्रतिबंधात्मक कारवाई

व्यापाऱ्यांविरोधात तक्रार देऊनही पोलिस गुन्हा दाखल करीत नाहीत. व्यापाऱ्यांना पोलिस पाठीशी घालत असल्याचा आरोप पाटील यांनी केला होता. व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी वंदना व सुनील पाटील हे 18 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत आहेत. 15 ऑगस्ट रोजी वंदना यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी पाटील दाम्पत्याला ताब्यात घेतले. उपोषणाचा मंडपही गुंडाळण्यात आला. वंदना यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतरही पाटील दाम्पत्य मंगळवारी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे.

गुलाबराव पाटलांनी घातले लक्ष

न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहील. असे पाटील दांपत्याने सांगितले. पोलिसांनी उपोषण मंडप गुंडळल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पाटील यांच्या तक्रारीवरुन सर्व प्रकारची चौकशी झालेली आहे. त्यांचे प्रकरण माहिती आहे. पोलिसांनी त्यांना आवश्यक सहकार्य करावे, अशा सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...