आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जामनेर तालुक्यातील नांद्रा (प्र.लोहारा) येथे लहान भाऊ व जन्मदात्या बापाचा पोटच्या मुलाने धारदार चाकूने सपासप वार करून निर्घृणपणे खून केल्याची मन सुन्न करणारी घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. शेजाऱ्यांशी भांडण का करतो म्हणून रागवल्याने मुलानेच बापाचा व भावाचा खून केल्याचे पोलिस तपासात समाेर आले आहे. या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.
वडील आनंदा कडू पाटील व लहान भाऊ महेंद्र आनंदा पाटील असे खून झालेल्यांची नावे आहेत. तर नीलेश आनंदा पाटील हा आरोपी आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.