आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिंगरोडजवळील यशवंत कॉलनीतील खुल्या भूखंडात नाल्यावरील सांडपाणी पाहिजे तेव्हा अडवले. त्यानंतर हेच पाणी पाणडुबीद्वारे झाडांना दिले. तसेच बोअरिंग द्वारेदेखील अनेकदा या झाडांना पाणी देत गेल्या दोन वर्षांपासून वडील अनिल अग्रवाल व मुलगा अनुज अग्रवाल यांनी विविध जातीची फुलझाडे, शोभेची झाडे व मोठे वृक्ष मिळून १०० वृक्ष स्वखर्चाने जगवली आहे.
कोरोनाचा लॉकडाऊन काळ अनेकांसाठी जीवघेणा ठरला. या काळात सर्वच उद्योगधंदे ठप्प झाले होते. या काळाचा सदुपयोग करत या पिता-पुत्राने खुल्या भूखंडात विविध जातीची वृक्ष लावली. त्यात शोभेच्या झाडांसह फळझाडे, फुलझाडे तर लावलीच याचबरोबर मोठे डेरेदार वृक्षही लावले. झाडांना व्यवस्थित पाणी देता यावे यासाठी या पिता-पुत्राने येथे ठिबक, स्प्रिंकलर, पाणडुबीही बसवून घेतली. आज १००हून अधिक वृक्ष जगली आहेत.
वृक्षवाढीसाठी ५० हजार रुपयांच्यावर खर्च
अनिल अग्रवाल व त्यांचा मुलगा अनुज व नि:स्वार्थ सेवा देणारा शरद जाधव यांनी ही वनराई फुलवली आहे. स्प्रिंकलर, पाणडुबी व ठिबकसाठी अग्रवाल यांनी ५० हजारांच्या वर खर्च केला आहे. तसेच येथे तयार होणारे रोप, दिंडीमध्ये जाणाऱ्या महिलांना तुळशीसह कुंडी अग्रवाल स्वखर्चाने पुरवतात.
या वृक्षवेली येथे फुलवल्या : सांडपाण्यातून या खुल्या भूखंडावर निंब, वड, पिंपळ, नीलगिरी, गुलमोहोर आदी मोठे वृक्ष वाढत आहेत. पपई, चिकू, पेरू, आंबा, आवळा, चिंच, केळी, ऊस, बदाम, जांभूळ, पपई, नारळ ही फळझाडे अग्रवाल यांनी लावली आहे. तसेच फुलझाडांत चांदणी,कण्हेर, जास्वंदीसह मोरपंखी, मनीप्लॅट, अशोक वृक्ष, बांबू आदी १००हून वेगवेगळ्या जातीचे वृक्ष फुलवली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.