आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीसीटीव्हीने केली पोलखोल:पिता-पूत्र करीत होते मोबाईलची चोरी; एकेक करुन लांबवले 11 मोबाईल, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जळगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोलाणी मार्केट येथे मोबाईल खरेदी करण्याच्या बहाणा करून 1 लाख 65 हजार रुपयांचे 11 मोबाईल चोरुन पलायन केलेल्या पिता-पुत्रास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासात नाशिक येथुन आज अटक केली. पोलिस सीसीटीव्ही फुटेजमधून संशयितांपर्यंत पोहोचले.

कैलास श्रीबलराम लालवाणी (वय 48) व त्याचा मुलगा सुमित कैलास लालवाणी (वय 23, रा. वारसीया परीसर सिंधी कॉलनी, बडोदरा, गुजरात) असे अटक केलेल्या पिता-पुत्राचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील गोलाणी मार्केटमधील गुरूकृपा मोबाईल केअर या दुकानावर 14 जून रोजी दुपारी दोन वाजता कैलास व त्याचा मुलगा सुमित दोघे मोबाइल खरेदी करण्याच्या बहाण्याने आले. त्यांनी 11 मोबाइल खरेदी केले. हे मोबाइल बॅगमध्ये ठेवले. तर त्यांच्याजवळ असलेली दुसरी एक बॅग मोबाइल दुकानात ठेवली. अजून दुसऱ्या दुकानात मोबाइल पाहुन येतो, नंतर पेमेंट करु असे सांगुन ते एक बॅग सोबत घेऊन गेले.

दुकानात ठेवलेल्या बॅगेत मोबाइल असल्याचा समज दुकानादास झाला होता. तासाभरानंतर दुकानदाराने बॅग तपासली असता त्यात कपडे, टॉवेल मिळुन आले. तर लालवाणी पिता-पुत्र दुकानदाराची नजर चुकवून मोबाइल ठेवलेली बॅग घेऊन पसार झाले होते.

हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरात चित्रीत झाला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लागलीच फुटेज तपासले. दोघेजण रेल्वेने नाशिककडे जात असल्याची माहिती मिळाली. अवघ्या काही तासातच पोलिसांनी दोघांना नाशिक रेल्वेस्थानकावरुन ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सर्व मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...