आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजावई व सासरा एकाच दुचाकीवरून जात असतांना त्यांच्या दुचाकीला मागून आलेल्या भरधाव ट्रकने धडक दिली. त्यात सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर जावई जखमी झाला. ही घटना १९ रोजी सायकांळी चाळीसगाव- धुळे महामार्गावर जामदा फाट्याजवळ घडली. सुभाष नथ्थू राठोड (वय ४५) असे मृताचे नाव आहे. धडक िदल्यानंतर पळ काढणाऱ्या ट्रकचा पाठलाग करून नागरिकांनी गिरणा हायस्कूलजवळ हा ट्रक पकडला. मुळचे मोरदड तांडा (ता.जि. धुळे) येथील असलेले अनिल गोरख चव्हाण (वय २६) हे पुणे एमआयडीसीत कामाला आहेत. ते सध्या पत्नीसह आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी मोरदड तांडा येथे आले होते.
त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी त्याचे सासरे सुभाष नथ्थु राठोड (रा.सेवानगर तांडा ता.चाळीसगाव) हे माेरदडा तांडा येथे आले होते. रविवार, १९ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सासरे सुभाष राठोड यांना मोरदड तांडा येथून त्यांचे गावी सेवानगर येथे सोडण्यासाठी (क्र.एम.एच.१८ बीटी.९०५२) या दुचाकीवरून मेहुणबारे मार्गे सेवानगर तांडा येथे येत असतांना जामदा फाट्याजवळ पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने (क्र. एन.एल.०१ ए.ई.८४६३) जोरदार धडक दिली. त्यात मोटारसायकलवर पाठीमागे बसलेले सुभाष राठोड हे रस्त्यावर पडले.
त्यावेळी ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने सुभाष राठोड त्यांचा मृत्यू झाला. तर अनिल चव्हाण हे किरकोळ जखमी झाले तसेच मोटारसायकलचेही नुकसान झाले. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक पळून जात असतांना अनिल चव्हाण यांनी आरडाओरड केल्याने नागरिकांनी पळ काढणाऱ्या ट्रकचा पाठलाग करून ट्रक गिरणा हायस्कूलजवळ पकडला. सुभाष राठोड यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषीत केले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.