आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते सत्कार; व्ही-स्कूल उपक्रमातील उत्कृष्ट‎ काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान

जळगाव‎7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात व्ही-स्कूल‎ अॅपच्या माध्यमातून शिक्षणा साठी‎ उत्कृष्ट कार्य शिक्षकांचा प्रशस्तीपत्र‎ देऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील‎ यांच्या हस्ते सन्मान झाला‎ नियोजन भवनात आयोजित‎ कार्यक्रमात जळगाव तालुक्यातील‎ प्रणिता पाटील, माधवी वाघ, संगीता‎ गोहिल, योगेश भालेराव, मनोज‎ भालेराव, स्वप्नील कांडाळकर, सु.‎ ग. देवकर प्राथमिक शाळेतील‎ प्रशांत साखरे, सागर पाटील,‎ कुणाल पवार, तंत्रस्नेही शिक्षक‎ नितीन मेने, लोटन पवार, सुनील‎ दाभाडे यांचा प्रशस्तीपत्र देऊन‎ सन्मान करण्यात आला.‎ जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,‎ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी‎ अधिकारी डॉ. पंकज आशिया,‎ आदिवासी विभागाच्या प्रकल्प‎ अधिकारी विनीता सोनवणे,‎ शिक्षणाधिकारी विकास पाटील,‎ शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव,‎ व्होपाचे संस्थापक प्रफुल्ल‎ शशिकांत, संचालिका ऋतुजा जेवे,‎ उपशिक्षणाधिकारी राजेंद्र सपकाळे,‎ विजय पवार, व्ही-स्कुल जिल्हा‎ समन्वयक खलील शेख, शिक्षण‎ विस्तार अधिकारी सरला पाटील‎ यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.‎

लक्ष्मीकांत बिऱ्हाडे चा सत्कार‎ व्ही-स्कूल अंतर्गत कार्य करणाऱ्या‎ चाळीसगाव टीमचा सन्मान मंत्री‎ गुलाबराव पाटील यांनी केला.‎ जिल्हाधिकारी अभिजित राऊत,‎ जिल्हा परिषदेचे सीईओ पंकज‎ आशिया यांची उपस्थिती होती.‎ सर्वोदय शिक्षण प्रसारक लि.‎ उंबरखेड (ता. चाळीसगाव)‎ येथील कुंझर शाळेतून लक्ष्मीकांत‎ बिऱ्हाडे यांना उल्लेखनीय‎ कामगिरीबद्दल सन्मानपत्र देण्यात‎ आले.‎

बातम्या आणखी आहेत...