आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंजीर महागले:आवक घटल्याने अंजीर दीडशे रुपयांनी महागले

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानात अतिवृष्टीमुळे अंजीर पिकांचे नुकसान झाले आहे. परिणामी आवक कमी झाल्याने अंजीराच्या दरात प्रति किलो १५० रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. पूर्वी ७०० ते १ हजार रुपये प्रति किलो विकले जाणारे अंजीरचे दर आता ८०० ते ११०० रुपयांवर पोहाेचले आहे. आगामी काळात हे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे बाजारात बदामाची आवक चांगली होत आहे.

उत्सवांचे दिवस जवळ आले आहेत. त्यामुळे ड्रायफ्रूटची मागणी वाढू लागली आहे. मागणी वाढताच मार्केटमध्ये काजू, बदामापासून पिस्त्याच्या किमतीत वाढ झाली आहे. तसेच सण-उत्सवात मिठाईवाल्यांपासून अन्य लोकांची तुकडा काजूला अधिक मागणी असते. बाजारात तुकडा काजूचा तुटवडा आहे. याचे मुख्य कारण फॅक्टरीत नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. परिणामी तुकड्यांत घट झालेली आहे. पूर्वी अखंड आणि तुकडा काजूच्या किमतीत शंभर रुपयांचा फरक राहत होता; परंतु आता तुकडा काजूच्या तुटवड्याने दोन्ही दर एकसमान सुरू आहेत. सध्या तुकडा आणि अखंड काजू ६५० ते ६८० रुपये प्रतिकिलो दराने ठोकमध्ये विक्री करणे सुरू आहे. दिवाळीत मागणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते.

अक्रोडचे दर स्थिर : ८०० ते ८५० रुपये दराने मिळणारा पिस्ता नवरात्राेत्सवात ९८० ते १०८० रुपये किलाे दराने मिळताे आहे. किशमिशचे भाव स्थिर आहेत. त्यात रेग्युलर किशमिश २०० ते २२० रुपये, क्वालिटीवाला माल २६० ते २८० रुपये व एक्स्ट्रा प्रीमियम माल तीनशे रुपये प्रति किलो मिळत आहे. अक्रोडच्या किमती सध्या तरी स्थिर आहेत.

नवरात्राेत्सवात मागणी वाढली
सध्या नवरात्राेत्सवाचे उपवास सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर ड्रायफ्रूटच्या मागणीत १५ टक्के वाढ झाली असल्याचेे विक्रेत्यांकडून सांगण्यात येते आहे. पावसाळा संपला आहे. आता हिवाळा सुरू हाेणार असल्याने लाडू बनवण्यासाठी मागणी अधिक वाढण्याचे संकेत आहेत. या अनुषंगाने व्यावसायिकांनी आतापासून माल भरण्यावर प्राधान्य दिले असल्याचे चित्र समाेर येते आहे.

आणखी दर वाढण्याची शक्यता
अफगाणिस्तानात अधिक पाऊस असल्याने अंजीरच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे भाव वाढू लागले आहेत. भारत पाकिस्तानमार्गे अंजीर घेत असल्याने आवकही कमी झालेली आहे. सर्वच ड्रायफ्रूटचे दर दिवाळीच्या तोंडावर वाढण्याची शक्यता आहे.- शांतिलाल तिवारी, विक्रेता

अक्रोडचे दर स्थिर : ८०० ते ८५० रुपये दराने मिळणारा पिस्ता नवरात्राेत्सवात ९८० ते १०८० रुपये किलाे दराने मिळताे आहे. किशमिशचे भाव स्थिर आहेत. त्यात रेग्युलर किशमिश २०० ते २२० रुपये, क्वालिटीवाला माल २६० ते २८० रुपये व एक्स्ट्रा प्रीमियम माल तीनशे रुपये प्रति किलो मिळत आहे. अक्रोडच्या किमती सध्या तरी स्थिर आहेत.

बातम्या आणखी आहेत...