आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:मनोरुग्ण ठरवून डांभुर्णीत महिलेस मारहाण; पिंपळगावच्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी गावात २६ वर्षीय महिलेस मारहाण करुन तिचा विनयभंग केला. ही घटना ८ जून रोजी रात्री ९ वाजता घडली. पीडित महिलेस गावातील काही लोक मनोरुग्ण ठरवून चिडवत असतात. घटनेच्या दिवशी महिला तिच्या मुलास शौचास घेऊन जात असताना दिव्या राजेंद्र परदेशी हिने लाथ मारुन तिला खाली पाडले. डोक्यावर चापट मारली.

त्यानंतर गावातील काही लोकांनी समजूत काढून महिलेस घरी पाठवले. थोड्या वेळाने दिव्या परदेशी, सुनीता मोतीलाल परदेशी, राधाबाई महावीर परदेशी, सुरेखा शांतीलाल परदेशी, संतोष शिवलाल परदेशी, मोतीलाल मच्छिंद्र परदेशी व शांतीलाल महावीर परदेशी यांनी पीडितेच्या घरात घुसून सामानाची तोडफोड केली. महिलेचा गळा दाबला तसेच विनयभंग केला. या प्रकरणी पीडितेंने दिलेेल्या फिर्यादीवरुन आठ जणांविरुद्ध पिंपळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...