आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी पाठपुरावा:‘त्या’ भूखंडाचे आरक्षण रद्द करण्यासाठी तक्रार दाखल

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंप्राळ्यातील ‘त्या’ भूखंडासाठी महापालिकेने तातडीने ४.५५ काेटी रूपये माेजले आहेत. या प्रकरणातील महापालिकेच्या हातघाईबाबत तक्रारदार अतुल मुंदडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेवून जिल्हाधिकाऱ्यांना महापालिकेचे हित लक्षात घेवून या प्रकरणात कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

महापालिकेने आरक्षित जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पैसे वर्ग केले आहेत. ही जमीन घेणे महापालिकेच्या दृष्टीने याेग्य नसल्याने हे भूसंपादन रद्द करण्यात यावे तसेच न्यायालयात पुनर्विलाेकन अर्ज दाखल करून आरक्षण रद्द करावे अशी मागणी अतुल मुंदडा यांनी केली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, महापाैर आणि शहराचे आमदार सुरेश भाेळे यांना अर्ज देवून ही मागणी केली आहे. महापालिकेला ही जागा व्यावहारिकदृष्ट्य परवडणारी नाही, भाैगाेलिक दृष्ट्या विकसीत करणेही शक्य नसल्याने ही जागा परत करून पैसे परत घेणे शक्य आहे. न्यायालयात अशी प्रकरणे यापुर्वी झालेली असल्याचे संदर्भ अतुल मुंदडा यांनी त्यांच्या दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...