आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:जीएमसीत दाखल; कांचननगर येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांचननगरातील २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरात मंगळवारी दुपारी ३ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन हिरामण सोनवणे (वय २२, रा. भय्याची वखारीजवळ, कांचननगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी १४ जून रोजी सकाळी चेतनची आई कामावर गेली होती. चेतन सोनवणे हा घरी एकटा असताना दुपारी तीन वाजता त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी चेतनची आई घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. नागरिकांनी त्याला जीएमसीत दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.

बातम्या आणखी आहेत...