आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद:जिल्हा परिषद चौकात पुलाखाली भराव, आठवड्यात डांबरीकरण ; ५० मीटरपर्यंत केले जाणार काम

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू असून जिल्हा परिषद चौकात गर्डर उभारल्यानंतर पुलाखाली सुमारे तीन फुटांचा मोठा खड्डा झाला होता. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी अडचण येत होती. शनिवारी पुलाखाल भराव करून सपाटीकरण करण्यात आले. पुढच्या आठवड्यात दोन्ही बाजूने ५० मीटरपर्यंत डांबरीकरणाचे काम केले जाणार आहे.

शहरातील सर्वात जास्त वादग्रस्त ठरलेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. दरम्यान रेल्वे स्थानकाकडून जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाच्या खाली मोठा खड्डा तयार झाला होता. दोन्ही बाजूकडील वाहनधारकांना त्यातून मार्ग काढावा लागत होता. महिनाभरात पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे पावसाचे पाणी साचून तळे तयार होण्याची दाट शक्यता होती. त्यात मोठी दुर्घटना देखील होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी पुलाखाली भराव टाकण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार शनिवारी मक्तेदाराने भराव करून सपाटीकरण व दबाई केली. पुलाच्या दोन्ही बाजूने ५० मीटरपर्यंत डांबरीकरणाचे काम होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...