आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन मात्र यंदाही नोंदणी ऑनलाईन!:17 जूनला गुणपत्रक हाती पडल्यावर होणार फायनल प्रवेश

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणातर्फे 8 जूनला इयत्ता बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. दरम्यान विद्यार्थ्यांना 17 जून रोजी गुणपत्रक मिळणार असल्याने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून प्रवेश प्रक्रियेला सुरवात करण्यात आली आहे. खान्देशात पदवीच्या प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रिया ही ऑफलाईन होणार असल्याने गुणपत्रकाशिवाय प्रवेश होणार नाही. मात्र प्रवेशाला उशीर होऊ नये यासाठी शहरातील महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन नावनोंदणी सुरु आहे.

जळगाव जिल्ह्यात प्रथम वर्ष प्रवेशासाठी १०४ महाविद्यालयात २५ हजार ९७६ जागा उपलब्ध आहे. दरम्यान जागा कमी व विद्यार्थी संख्या अधिक असल्याने प्रवेशासाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे दोन वर्ष विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण घेतले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे असणारा कल देखील कमी झाला आहे. त्यामुळे यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमापेक्षा पदवी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे. राज्य मंडळातर्फे १७ जुन रोजी दुपारी ३ वाजता संबंधित महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. यानंतर प्रत्यक्ष प्रवेशाला सुरवात होईल. शहरातील मु.जे. महाविद्यालयासह अन्य महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरु केली आहे. यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अधिक वेळ वाया जाणार नाही.

--------

कला शाखेला सर्वाधिक जागा

यंदा जळगाव जिल्ह्यात कला शाखेच्या सर्वाधिक जागा असून विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष कला शाखेला ३९ महाविद्यालयात १२ हजार ७३४ जागा उपलब्ध आहे. तर सर्वात कमी जागा या वाणिज्य शाखेच्या आहे. सध्या वाणिज्य शाखेकडे कल वाढत असताना विद्यारातही संख्येच्या तुलनेत जागा कमी पडण्याचा अंदाज तज्ञांनी वर्तविली आहे.

------

अशा आहेत जागा

शाखा... महाविद्यालये.... जागा

कला - ३९ - १२,७३४

वाणिज्य - २९ - ५,९९५

विज्ञान - ३६ - ७,२४७

----------------

बातम्या आणखी आहेत...