आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हालचाली सुरू‎:अखेर मनपाला जाग,‎ भूसंपादनाचीही तयारी‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिव काॅलनीतील ३० मीटर रुंदीच्या‎ रस्त्यासाठी भूसंपादन करावे‎ लागणार आहे. त्यासाठी मनपाने‎ दाेन वर्षांपूर्वीच प्रस्ताव दिला हाेता;‎ परंतु मनपाला पैसे भरण्याचा विसर‎ पडला हाेता. आता मनपा‎ प्रशासनाकडून ५० टक्के रक्कम १‎ काेटी ८६ लाख रुपयांचा भरणा‎ करण्याची तयारी सुरू केली आहे.‎ त्यासाठी येत्या महासभेत मंजुरी‎ घेतली जाणार आहे.‎ शिव काॅलनीतून जाणाऱ्या ३०‎ मीटर (१०० फुटी) रस्त्याच्या‎ विकासासाठी मनपाकडून प्रयत्न‎ सुरू झाले आहेत. महामार्गापासून‎ सुरू हाेणाऱ्या या शंभर फुटी‎ रस्त्यासाठी बरीच जागा ताब्यात‎ घ्यावी लागणार आहे.

त्यासाठी गट‎ नंबर ६१/१ ब या जमिनीवरील सुमारे‎ फ्लाॅटचे भूसंपादन करावे लागणार‎ असल्याचे सांगीतले जात आहे.‎ यासाठी दाेन वर्षांपूर्वी मनपाने‎ भूसंपादन विभागाकडे प्रस्ताव सादर‎ केला हाेता. त्यानंतर मनपाकडून‎ काेणत्याही हालचाली न झाल्याने हा‎ विषय रेंगाळला हाेता. विशेष‎ भूसंपादन अधिकाऱ्यांनी यासंदर्भात‎ मनपाला पत्र पाठवून आठवण‎ करून दिली. त्यानंतर मनपाच्या‎ नगररचना विभागाकडून यासंदर्भात‎ हालचालींना वेग आला आहेे.‎ मनपाने भूसंपादनासाठी ५० टक्के‎ रक्कम अर्थात १ काेटी ८६ लाख ८‎ हजार रुपये भरणा करण्याचा प्रस्ताव‎ तयार केला आहे. येत्या महासभेत‎ मंजुरी घेतल्यानंतर रक्कम वर्ग केली‎ जाणार आहे. या अनुषंगाने‎ हालचाली सुरू आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...