आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रनिकेतनच्या पहिल्या प्रवेश फेरीस 19 ऑगस्टपासून सुरुवात:जळगाव जिल्ह्यात 16 महाविद्यालयात 4 हजार जागा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • Admission process, Diploma, conducted, Maharashtra State Directorate of Technical Education, Mumbai,

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्यातर्फे प्रथम वर्ष डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. 19 ऑगस्टपासून फेरीस सुरुवात होत आहे. 20 ते 23 ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे. त्याची पहिली यादी 25 ऑगस्टला जाहीर होणार आहे.

शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाल्यांनतर मिळालेली शाखा व महाविद्यालय 26 ते 29 ऑगस्टपर्यंत विद्यार्थी आपले प्रवेश निश्चित करतील.

30 ऑगस्टपर्यंत विद्यार्थी प्रत्यक्ष संस्थेत उपस्थित राहून आवश्यक त्या कागदपत्रांसह शुल्क भरून प्रवेश निश्चित करू शकतील. सर्व संस्थांनी शैक्षणिक उपक्रमांची सुरवात 12 सप्टेंबरपासून होईल. तर सर्व प्रकारच्या प्रवेशासाठी 29 सप्टेंबर ही अंतिम मुदत असेल. यानंतर संस्थांसाठी प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचा तपशील अपलोड करण्यासाठी 30 सप्टेंबर ही अंतिम मुदत असणार आहे.

दुसऱ्या फेरीसाठी 1 ते 4 सप्टेंबर दरम्यान

दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी रिक्त जागांची माहिती ३१ ऑगस्टला जाहीर प्रदर्शित होईल. १ ते ४ सप्टेंबर दरम्यान ऑप्शन फॉर्म भरू शकतील. तर ६ सप्टेंबर रोजी दुसऱ्या फेरीसाठी तात्पुरत्या जागा वाटप यादी जाहीर होईल. यानंतर ७ ते १० सप्टेंबर पर्यंत दुसऱ्या फेरीसाठी वाटप करण्यात आलेल्या जागेची स्वीकृती विद्यार्थी करू शकतील तर ७ ते ११ सप्टेंबर दरम्यान दुसऱ्या फेरीतील अर्ज निश्चित करता येणार आहे.

तिसरी फेरी 17 सप्टेंबरला

तंत्रशिक्षणतर्फे 12 सप्टेंबरला तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची माहिती जाहीर होईल. ऑप्शन फॉर्म भरण्याची मुदत 13 ते 15 सप्टेंबर दरम्यान आहे. 17 सप्टेंबरला जागा वाटप होतील. 18 ते 21 सप्टेंबर दरम्यान विद्यार्थी जागा निश्चित करू शकतील.

अशी आहे प्रवेशाची स्थिती

जळगाव - 16 - 3 हजार 957

धुळे - 10 - 2 हजार 737

नंदुरबार - 03 - 788

बातम्या आणखी आहेत...