आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासूर्यग्रहणानंतर या वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहणाची अनुभूती खगोलप्रेमींना शुक्रवारी बुद्धपाैर्णिमेच्या दिवशी रात्री ८ वाजून ४४ मिनिटांनी घेता येणार आहे. हे चंद्रग्रहण पाहिल्याने कुठलाही धोका, त्रास होणार नसल्याचा दावा खगोल अभ्यासकांनी केला आहे.
सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे ही घटना बघण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी कोणतेही समज- गैरसमज मनात न ठेवता या खगोलीय घटनेचा आनंद घ्यावा, असे अभ्यासकांनी सांगितले आहे. खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण आहेत. त्यातील फक्त चंद्रग्रहण भारतातून बघायला मिळणार आहे.
खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहणात चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीतून जात असल्याने आपल्याला आधी तो काळा व नंतर लाल दिसतो; परंतु शुक्रवारी चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेतून जाणार असल्याने चंद्र काळा व लाल न दिसता तो थोडासा काळपट आणि त्याचा प्रकाश थोडा मंद झालेला जाणवेल. ग्रहणाच्या वेळेत चंद्र पृथ्वीच्या विरळ सावलीला स्पर्श करेल आणि छायाकल्प चंद्रग्रहणाला सुरुवात होईल.
रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या विरळ गेलेला असेल. शनिवारी पहाटे हे ग्रहण संपलेले असेल. ग्रहणाचा काळ ४ तास १८ मिनिटांचा आहे. पुढचे चंद्रग्रहण २५ मार्चला असणार छायाकल्प चंद्रग्रहण आशिया, आस्ट्रेलिया, युरोप, पूर्व आफ्रिका, पेसिफिक, इंडियन आणि अॅटलांटिक महासागरातून दिसेल. या आधी ५ जून २०२० रोजी झालेले छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसले होते. त्याचा ग्रहण काळ ३ तास १८ मिनिटांचा होता.
यापुढचे छायाकल्प चंद्रग्रहण हे २५ मार्च २०२४ रोजी आहे; पण ते फक्त उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतून दिसणार असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. अवकाशात पृथ्वीच्या दोन सावल्या पडतात गडद सावली आणि विरळ सावली. चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा आणि पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा (आयनिक वृत्त) यांच्यात ५ अंशाचा कोन आहे. चंद्राची कक्षा आयनिक वृत्ताला दोन ठिकाणी छेदते त्या बिंदूंना राहू, केतू असे म्हणतात.
थोडक्यात म्हणजे सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत ज्या बिंदूपाशी येतात त्यांना राहू आणि केतू असे म्हणतात. चंद्राच्या कक्षेत आयनिक वृत्तात असलेल्या कोनामुळे प्रत्येक पौर्णिमेला चंद्र या बिंदूंवर असतोच असे नाही. चंद्र जसा पृथ्वीभोवती फिरतो तशी पृथ्वी पण सूर्याभोवती फिरते. त्यामुळे हे दोन्ही बिंदू सुद्धा फिरत असतात.
ज्या दिवशी पृथ्वी आणि सूर्य यांना जोडणाऱ्या रेषेवर राहू किंवा केतू हे बिंदू असताना तेथे चंद्र आला तर तो पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो आणि ‘खग्रास’ चंद्रग्रहण पाहायला मिळते. थोडक्यात असे की जो पर्यंत सूर्य, पृथ्वी, चंद्र आणि हे दोन बिंदू पैकी एक समान प्रतलात येत नाही तो पर्यंत कोणतेही ग्रहण होत नाही.
काय आहे छायाकल्प चंद्रग्रहण
प्रत्येक वेळी फक्त खग्रास चंद्रग्रहण होते असे नाही तर ‘छायाकल्प’ किंवा ‘खंडग्रास’ चंद्रग्रहणही होते. चंद्र राहू किंवा केतू या बिंदूंच्या खूप वर (उत्तरेला) किंवा खाली (दक्षिणेला) असतो. अशा वेळी चंद्र पृथ्वीच्या फक्त विरळ सावलीतून पूर्ण किंवा अर्धाच जातो या ग्रहणाला ‘छायाकल्प’ चंद्रग्रहण म्हणतात, असे अभ्यासकांनी सांगितले.
ज्योतिषशास्त्री विनोद त्रिपाठी यांनुसार ग्रहणावेळी राशीवर होणारा परिणाम
मेष : एखादा चुकीचा निर्णय महागात पडू शकतो. वृषभ : कुटुंबात तणावपूर्ण स्थिती असेल. त्यामुळे या काळात काळजी घ्या. कर्क : आरोग्याच्या तक्रारी डोकं वर काढतील. नोकरीच्या ठिकाणी त्रास होऊ शकतो. सिंह : काही वाईट बातमी कानावर पडल्याने अस्वस्थता वाढेल. कुटुंबाची काळजी घेणं गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. कन्या : उत्तरार्धात थोडे मानसिक ताण राहील मात्र इतर कोणतेही वाईट परिणाम नाही. तूळ : तुला ही शुक्राची राशी असल्याने विवाह इच्छुकांच्या बोलणी फिस्कटतील. वृश्चिक : नवीन घर घेणाऱ्यांसाठी काही काळ थांबणे योग्य राहील अन्यथा फसवणूक होऊ शकते. धनू : या राशींच्या जातकांना क्रोध अनावर होईल. क्रोधामुळे संबंध दुरावतील. छोट्या अपघाताची देखील शक्यता. मकर : या राशीच्या जातकांना मिश्र स्वरूपाचे फळ छायाकल्प चंद्रग्रहणामुळे मिळणार आहे. कुंभ : या राशीतील लाेकांना भाग्योदयात अडचणी येतील. धार्मिक यात्रा टाळाव्या; मात्र चंद्रग्रहणामुळे जुन्या व्याधी डोकं वर काढतील. मीन : धार्मिकतेकडे मन रमेल. चंद्रग्रहणामुळे काही काळ जवळच्या व्यक्ती दुरावतील. गोंधळाची स्थिती होईल.
काय आहे छायाकल्प चंद्रग्रहण प्रत्येक वेळी फक्त खग्रास चंद्रग्रहण होते असे नाही तर ‘छायाकल्प’ किंवा ‘खंडग्रास’ चंद्रग्रहणही होते. चंद्र राहू किंवा केतू या बिंदूंच्या खूप वर (उत्तरेला) किंवा खाली (दक्षिणेला) असतो. अशा वेळी चंद्र पृथ्वीच्या फक्त विरळ सावलीतून पूर्ण किंवा अर्धाच जातो या ग्रहणाला ‘छायाकल्प’ चंद्रग्रहण म्हणतात, असे अभ्यासकांनी सांगितले. ज्योतिषशास्त्री विनोद त्रिपाठी यांनुसार ग्रहणावेळी राशीवर होणारा परिणाम मेष : एखादा चुकीचा निर्णय महागात पडू शकतो. वृषभ : कुटुंबात तणावपूर्ण स्थिती असेल. त्यामुळे या काळात काळजी घ्या. कर्क : आरोग्याच्या तक्रारी डोकं वर काढतील. नोकरीच्या ठिकाणी त्रास होऊ शकतो. सिंह : काही वाईट बातमी कानावर पडल्याने अस्वस्थता वाढेल. कुटुंबाची काळजी घेणं गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. कन्या : उत्तरार्धात थोडे मानसिक ताण राहील मात्र इतर कोणतेही वाईट परिणाम नाही. तूळ : तुला ही शुक्राची राशी असल्याने विवाह इच्छुकांच्या बोलणी फिस्कटतील. वृश्चिक : नवीन घर घेणाऱ्यांसाठी काही काळ थांबणे योग्य राहील अन्यथा फसवणूक होऊ शकते. धनू : या राशींच्या जातकांना क्रोध अनावर होईल. क्रोधामुळे संबंध दुरावतील. छोट्या अपघाताची देखील शक्यता. मकर : या राशीच्या जातकांना मिश्र स्वरूपाचे फळ छायाकल्प चंद्रग्रहणामुळे मिळणार आहे. कुंभ : या राशीतील लाेकांना भाग्योदयात अडचणी येतील. धार्मिक यात्रा टाळाव्या; मात्र चंद्रग्रहणामुळे जुन्या व्याधी डोकं वर काढतील. मीन : धार्मिकतेकडे मन रमेल. चंद्रग्रहणामुळे काही काळ जवळच्या व्यक्ती दुरावतील. गोंधळाची स्थिती होईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.