आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चोपडा:'बरं वुई गये मी चांगला वुई गऊ'; चोपडा तालुक्यातील पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाने अहिरणीमधून व्यक्त केल्या भावना

चोपडाएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • उपचार करणाऱ्या डॉक्टर व तहसीलदारानी टाळ्या वाजवून फुलांच्या वर्षावात दिला निरोप

खान्देशी अहिराणी भाषा म्हणजे अनेकांना नेहमी भुरळ घालत असते. सबंध महाराष्ट्रभर अहिराणी कवी म्हणून आदराने बहिणाबाई यांचे नाव घेतले जाते.अशाच एक अहिराणी भाषिक असलेले व मृत्यूच्या दारातून परत आलेले तालुक्यातील अडावद येथील ५८ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जेव्हा घरी जात होते, त्या दरम्यान दिव्य मराठीने त्यांच्याशी तब्बेतीबद्दल विचारले असताना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. यावेळी त्यांनी सांगितले की,'बरं वुई गये भो,मी चांगला वुई गऊ,म्हले घर जाऊ द्या,मनावर चोपडाना सुरेशदादा व मनोजदादा या दोन्ही डॉक्टरशि द्यान दीदी म्हणीसन मी आज घर चालनू,मस्त वाटी राहिणं" अशा भावना व्यक्त करत चोपडा तालुक्यातील अडावद येथील पहिला रुग्ण उपचारा नंतर आज घरी गेला आहे.

चोपडा शहर व अडावद गावात कोरोना मुळे रुग्णाची संख्या वाढत असताना एकूण तालुक्यात १४ पॉझिटिव्ह सापडल्या नंतर तीन जण मयत झाले होते तर आज त्यापैकी पहिला अडावद येथील ५८ वर्षीय रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे.चोपडा तालुक्यातील अडावद गावाने कोरोना ची एन्ट्री केली होती, त्यानंतर चोपडा शहरात एकच दिवशी सात रुग्ण सापडले होते.

अडावद येथील मयत पहिल्या रुग्णाच्या संपर्कात आलेला होता म्हणून आज बरा झालेला रुग्ण हा पोजिटिव्ह सापडला होता पण दहा दिवसाच्या उपचार नंतर त्या पहिला पोजिटिव्ह रुग्ण पूर्णपणे बरा होऊन घरी परतला आहे.

पहिला रुग्ण घरी जाताना प्रशासनाने केला त्यावर फुलांचा वर्षाव

अडावद येथील हा पहिला रुग्ण बरा होऊन त्याला रुग्णवाहिका द्वारे घरी सोडण्यात आले असून कोव्हिड सेंटरच्या बाहेर ते घरी जात असताना त्यावर तहसीलदार अनिल गावित, नगरपालिकेचे गटनेते जीवन चौधरी,उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ मनोज पाटील,चोपडा शहराचे एपीआय मनोज पवार, पालिकेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर,उपचार करणारे डॉ सुरेश पाटील,डॉ राहुल बी पाटील(मोहिदा) यांनी बरा झालेल्या रुग्णांवर फुले फेकून टाळ्या वाजवत त्याचे स्वागत केले व त्यांना रुग्णवाहिकेत बसविण्यात आले होते.

१६ रोजी अडावद येथील कोरोणा बाधित रुग्ण पूर्ण बरा होऊन त्याला संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास  रुग्णवाहिकेतून घरी सोडण्यात आल्याने तालुक्याला एक मोठा दिलासा मिळाला आहे.

डॉ सुरेश पाटील यांनी केली ट्रीटमेंट

६ मे रोजी अडावद येथील ५८ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णांवर दहा दिवस चोपडा कोविड सेंटरला उपजिल्हा रुग्णालयाचे वैधकीय अधीकारी डॉ सुरेश पाटील यांनी उपचार केले होते. उपचारादरम्यान चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ मनोज पाटील,डॉ सुरेश पाटील,कोविड सेंटरचे अधिकारी डॉ राहुल बी पाटील(मोहिदा) यांनी उपचार केलेत. गेल्या दहा दिवसापासून रुग्णाला  हायड्रोक्सीक्लोरीक्वीन,आझोथ्रोमायसीन,मल्टिव्हिटॅमिन व इतर औषधांच्या माध्यमातून  उपचार करण्यात आलेत. तसेच पुढील चौदा दिवस त्या रुग्णाला घरीच राहण्याचा डॉक्टरांनी  सल्ला दिला आहे. तसेच अडावद येथील आरोग्य केंद्राच्या माध्यमातून त्या बरा झालेल्या रुग्णाची तपासणी करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...