आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरा डोस:जळगाव येथे 249 मुलांना गोवरचा पहिला, दुसरा डोस

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोवरबाबत उपाययोजना करण्यात येत असून जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार १५ डिसेंबरपासून विशेष लसीकरण शिबिर राबवण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसात महापालिकेतर्फे जळगाव शहरात १२८ मुलांना पहिला डोस तर १२१ मुलांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. या सोबतच उद्रेक असलेल्या परिसरातील २१ मुलांना लसीचा तिसरा डोस देण्यात आला आहे.

सध्या वातावरणात बदल झाला असून आरोग्याच्या समस्या वाढल्या आहे. त्यातच गोवरचा राज्यभरात प्रादुर्भाव वाढत आहे. जळगावात त्याचा उद्रेक होऊ नये याकरिता उपाययोजना राबवल्या जात आहे. लसीकरणासोबतच शहरात सर्वेक्षण देखील सुरु आहे. घरोघरी जाऊन तपासणी करून पालकांना गोवर व लसीकरणाबाबत माहिती देण्यात येत आहे. दरम्यान, जळगाव शहरात दररोज तीन ते चार हजार घरांचे सर्वेक्षण केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...